सोलापुरात कसा झाला १४ काळविटांचा मृत्यू, काय होतं कारण?

सोलापूर-पुणे (Solapur-Pune) राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) नव्याने तयार करण्यात आलेल्या विजापूर (Vijapur Bypass) बायपास उड्डाणपुलावरून पडल्याने 14 काळविटं व हरणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

    सोलापूर : सोलापूर-पुणे (Solapur-Pune) राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) नव्याने तयार करण्यात आलेल्या विजापूर (Vijapur Bypass) बायपास उड्डाणपुलावरून पडल्याने 14 काळविटं व हरणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, ही घटना नेमकी कशी झाली याचे कारण आता समोर आले आहे.

    सोलापूर जिल्ह्यात रविवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. जीव वाचवण्यासाठी त्याने पुलावरून उडी मारल्याने हा अपघात झाला. सोलापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सोलापूर-विजापूर बायपास रस्त्यावरील पुलावरून उडी मारली आणि यामध्ये 14 काळविटांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सर्व काळविटांचे मृतदेह महामार्गावरून बाजूला करण्यात आले. पुलावरून उडी मारून अनेक काळविटं जखमी झाली, नंतर त्यांचा मृत्यू झाला.

    वाहने पाहून कळप घाबरला

    महामार्गावर वेगाने येणारी वाहने आणि वाहतूक पाहून काळविटांचा कळप घाबरला आणि त्याने जवळच्या पुलावरून उडी मारली. या अपघातात सर्व बारा काळविटांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रत्यक्षात ही सर्व काळविटं सोलापूर-मंद्रूप बायपास रस्त्यावरून जात होती. काळविटं रस्ता ओलांडण्याआधीच रस्त्यावरील वाहतूक वाढल्याने ते सर्व घाबरले आणि त्याने पुलावरून उडी मारली. पुलाखालील दगड आदळल्याने सर्व काळविटांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

    सतत होतात असे प्रकार

    काळविटांचा अशाप्रकारे आज अपघातात मृत्यू झाला. पण यापूर्वी देखील अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये इतर वन्यजीवांचा जीव गेला आहे. त्यानंतर आज सोलापूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.