पावसामुळं धरणाच्या पाणी साठ्यात किती वाढ? जाणून घ्या राज्यातील तलाव आणि धरणांची काय स्थिती?

राज्यातील काही धरणं व तलावात पावसामुळं पाण्याच्या पातळीत (WATER LAVEL) वाढ झाली आहे. त्यामुळे तिथल्या धरणात समाधानकारक पाणी असल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप अनेक भागाकडे पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे लोकांना अजूनही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

  ठाणे : राज्यात मान्सूनने उशिरा सुरुवात केली आहे. पण उशिरा सुरुवात केलेल्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे.  तर दुसरीकडे महाराष्ट्रातील (MAHARASHTRA) बहुतांश जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. तसेच राज्यातील अनेक धरणं (DAMP) व तलाव अद्याप कोरडी असल्याचं पाहायला मिळालं आहे. ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, तिथं धरणात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर काही छोटी धरणं भरली सुद्धा आहेत. राज्यातील काही धरणं व तलावात पावसामुळं पाण्याच्या पातळीत (WATER LAVEL) वाढ झाली आहे. त्यामुळे तिथल्या धरणात समाधानकारक पाणी असल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप अनेक भागाकडे पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे लोकांना अजूनही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मुंबई व ठाणेकरांना पाणी पुरवठ करणाऱ्या तलावात देखील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

  ठाण्यातील धरण तलावात किती पाणीसाठा?

  दरम्यान, मुंबईकरांना व ठाणेकरांना पाण्याची तहान भागवणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील अनेत तलाव धरणात पावसामुळं पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळं पुढील काही दिवस तरी पाण्याची चिंता मिटली आहे.

  तलाव                  पातळी (मीटर्समध्ये)          कित्ती टक्क्यांनी वाढ

  अप्पर वैतरणा       ५९६.५०                                 १२

  मोडकसागर         १५६.४१                                  ३९

  तानसा                  १२५.९०                                  २१

  मध्य वैतरणा         २६६                                       ७८

  भातसा                 ११८                                        ५८

  विहार                   ७७                                        १५

  तुळशी                  १३७                                      ३०

  राज्यातील धरणात किती टक्के पाणीसाठा

  राज्यातील ५६ धरणांनी यंदाच्यावर्षी तळ गाठला होता. काही धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. कालपर्यंत म्हणजे १७ जुलैपर्यंत अमरावती विभागात १० मुख्य धरणं आहेत. त्यामध्ये ४४ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी पाण्याचासाठा ६३ टक्के होता. औरंगाबाद विभागात ४४ मुख्य धरणं आहेत. सध्याचा पाणीसाठी ३१ टक्के आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी ६० टक्के पाणीसाठा होता. नागपूर जिल्ह्यात १६ मुख्य धरणं आहेत. त्यामध्ये आज ५२ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याचं दिवशी ५५ टक्के पाणीसाठी होता. नाशिक जिल्ह्यात २३ मुख्य धरणं आहेत. सध्याचा पाणीसाठा ३६ टक्के आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी पाणीसाठा ६७ टक्के होता. पुणे विभागात मुख्य ३५ धरणं आहेत. यावर्षी २१ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी ५५ टक्के पाणीसाठा होता. कोकणात ११ मुख्य धरणं आहेत. सध्याचा पाणीसाठा ५० ट्क्के आहे. गेल्यावर्षी याचदिवशी ८४ टक्के होता.