शरद पवार गट किती जागा जिंकणार? जयंत पाटील यांनी थेट सांगितला आकडा

यंत पाटील यांनी येत्या निवडणूकीमध्ये शरद पवार किती जागा जिंकेल याबाबत वक्तव्य केले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

    सांगली – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण रंगले आहे. नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून दोन्ही आघाडी विजयाचा विश्वास व्यक्त करत आहेत. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी देखील जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रचारसभेमध्ये विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. त्याचबरोबर जयंत पाटील यांनी येत्या निवडणूकीमध्ये शरद पवार किती जागा जिंकेल याबाबत वक्तव्य केले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

    10 पैकी 7 जागा जिंकल्या आहेत

    प्रचारसभेमध्ये बोलताना जयंत पाटील म्हणाले, या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील आणि जानकर यांच्या निर्णयाचा राज्यभर परिणाम दिसत आहे. 10 पैकी 7 जागा शरद पवार गटाने जिंकल्या आहेत, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. तसेच “सध्या महायुतीत असणारे भाजप, अजितदादा आणि शिवसेना यांच्याकडील 12 ते 15 जणांनी राष्ट्रवादीत येण्याचा शब्द दिला असून लोकसभेनंतर ही सर्व मंडळी शरद पवार गटात येतील,” असा धक्कादायक दावा देखील जयंत पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर “हे नेमके कोण आहेत याचा तपशील सांगून मी त्यांना अडचणीत आणणार नाही? थोडे दिवस जाऊ दे असे सांगत दिल्लीत सत्तांतर होणार आणि महाराष्ट्रात सत्तांतर होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे,” असा दावा देखील जयंत पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

    माढ्याचा निकाल आजच जाहीर करायला हरकत नाही

    पुढे त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघाबाबत वक्तव्य केले. जयंत पाटील म्हणाले, “माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील उभे असून उत्तम जानकर यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते व जानकर एकत्र आल्याने माढ्याचा निकाल आजच जाहीर करायला हरकत नाही असे सांगितले. माळशिरस विधानसभेसाठी उत्तम जानकर लढण्यास इच्छुक असून त्यांना आम्ही येथून आमदार करणार असा शब्दही दिला आहे,” असे देखील जयंत पाटील म्हणाले आहेत.