बोम्मईंच्या वक्तव्यावर अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला ‘हा’ गर्भित इशारा, …अन्यथा ‘असं’ होईल

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. कर्नाटकचे (Karnatka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी केलेले वक्तव्याचा मी निषेध करतो. तसेच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना शिंदे-फडणवीस सरकारने कडक शब्दांत उत्तरे द्यावे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

    मुंबई –  कर्नाटकचे (Karnatka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी एक गाव काय? बेळगाव, कारवार, निपाणीचा एक तुकडा देखील महाराष्ट्राला देणार नाही. उलट सांगलीतील काही गावांवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला आहे, त्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा पेटला आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकारवर व केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) गप्प का? असा सवाल उपस्थित केला जात असून, सरकारवर टिका केली जात आहे.

    दरम्यान, यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. कर्नाटकचे (Karnatka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी केलेले वक्तव्याचा मी निषेध करतो. तसेच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना शिंदे-फडणवीस सरकारने कडक शब्दांत उत्तरे द्यावे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तुम्ही शांत का बसला आहात. शिंदे-फडणवीस काही भूमिका घेत नसल्यामुळं महाराष्ट्रात एक वेगळा संदेश जात आहे.

    कर्नाटकचे मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत, म्हणून तुम्ही शांत बसला आहात का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे. तसेच जर तुम्ही काही बोलला नाहीत तर जनता तुम्हाला वेळीच उत्तर देईल असा गर्भित इशारा देखील अजित पवारांनी राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांना शिंदे-फडणवीस सरकारने कडक शब्दांत उत्तरे द्यावे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.