सांगली प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेत प्रचंड गदारोळ ; अंडी फेकली , घोषणाबाजी, फलक फडकावले

इमारत बांधकामसह सर्व विषय बहुमताने मंजूर

  सांगली :सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅँकेच्या सभेत अपक्षेप्रमाणे प्रचंड गदारोळ झाला. नवीन इमारत बांधकाम, लाभांश वाटपावरून विरोधकांनी घोषणाबाजी करत सभेत फलक फडकावले, तर सत्ताधाऱ्यांनीही शांत राहत फलक फडकावत प्रतिउत्तर दिले. हा गोंधळ सुरु असतानाचा मागून दोन अंडी मंचाच्या दिशेने फिरकवण्यात आली. यामुळे सत्ताधारी – विरोधी सभासदांमध्ये जोरदार घमासान सुरु झाले. अंडी फिरकवणाऱ्याना काहींनी चोपही दिला. या प्रकारानंतर विरोधकांनी सभात्याग केला. यानंतर सभा शांततेत पार पडली. बॅँकेच्या नवीन इमारत बांधकामासह विषयपत्रीकेवरील सर्व विषय बहुमताने टाळ्यांच्या गजरात मंजुर करण्यात आले.

  सांगली चिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथी डेक्कन मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी बॅँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे होते. शिक्षक बँकेच्या नवीन इमारत बांधकाम व लाभांशावरून गेली काही दिवस बँकेतील सत्ताधारी स्वाभीमानी प्राथमिक शिक्षक मंडळ व विरोधकांच्या शिक्षक बँक बाचव कृती समितीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु होते. याचे पडसाद अपेक्षेप्रमाणे बँकेच्या वार्षिक सभेत उमटले. सत्ताधाऱ्यांनी पध्दतशीर व्युहरचना आखत सभागृहात पुढच्या जागांवर महिला व सत्ताधारी सभासदच बसतील अशी व्यवस्था केली होती.

  -जोरदार घोषणाबाजी
  सभेला सत्ताधारी सभासदानाही मोठ्या संख्यने हजेरी लावली होती. त्या तुलनेत विरोधकांचे संख्याबळ नगण्य होते. मात्र सभा सुरु होण्यापुर्वीच विरोधकांनी मागून जोरदार घोषणाबाजी सुरु होती. नवीन इमारत बांधकामाचा ठराव रद्द झालाच पाहिजे, लाभांश आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाच्या, चेअरमन तुपाशी, सभासद उपाशी अशा प्रकारचे फलक फडकावत जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. सत्ताधारी मात्र विरोधकांच्या दंग्याकडे फरसे लक्ष न देता सभा कामकाज करत होते. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोले यांनी नोटीस वाचन केले. यानंतर अध्यक्ष विनायक शिंदे यांनी सभासदांचे स्वागत करून विषय पत्रिकेवरील विषय वाचनास सुरुवात केली.

  -विरोधकांचा गोधळ
  यावेळी विरोधकांचा गोधळ, घोषणाबाजी वाढली. या दरम्यानच मोगून दोन अंडी मंचाच्या दिशेने फिरकवण्यात आली. यातील एक अंडे महिला सभासदांमध्ये जाऊन पडले. यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी सभासदांनी जागेवर उभा राहून विरोधकांना जाब विचारण्यास सुरवात केली. यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. अंडी फेकलेल्या संतप्त सताधारी संचालकांनीही विरोधकांना खडे बोल सुनावत शिक्षकी पेशला काळीमा फासत असल्याचा आरोप केला. या गोंधळात सत्ताधारी सदस्यांनीही गेल्या वर्षभरात घेतलेल्या निर्णयांचे फलक फडकावले. दोन्ही बाजूंनी फलक युध्द सुरु असताना अंडी फेकणाऱ्या एका सभासदांना कांहींनी चोप देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहात आणखीन गोंधळ वाढला. अध्यक्ष विनायक शिंदे यांनी वारंवारं शांततेचे अवाहन केले. सभा दिवसभर चालवू, सभासदांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊ, असे अवाहनही शिंदे यांनी केली. मात्र विरोधकांनी त्याला दाद दिली नाही. त्यांचा गोधळ सुरुच होता.

  दरम्यान शिंदे यांनी विषयांचे वाचन सुरुच ठेवले. अखेर विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला. यानंतर सत्ताधाऱ्यांनी सभेचे कामकाज सुरळीत पार पाडत. सर्व विषयांना बहुमताने टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. आभार उपाध्यक्ष अनिता काटे यांनी मानले.

  यावेळी बँकेच्या उपाध्यक्षा अनिता काटे, संचालक रुपाली गुरव, शामगोंडा पाटील, अमोश शिंदे, धनाजी घाडगे, अशोक घागरे, संजय महिंद, फत्तू नदाफ, नितीन चव्हाण, अजितराव पाटील, गांधी चौगुले, शब्बीर तांबोळी, शरद चव्हाण, संतोष जगताप, अमोल शिंदे, मिलन नागणे, राहूल पाटणे, अमोल माने, सचिन खरमाटे, श्रीकांत पवार, श्रीमंत पाटील यांच्यासह संघाचे सरचिटणीस अविनाश गुरव, मुश्ताक पटेल, स्वाभीमानी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उ उपस्थित होते. एकमेव विरोधी संचालक कृष्णा पोळ यांनी सभेला दांडी मारली.

  अंडी फेकणाऱ्यांचे सभासदत्व रद्द
  शिक्षक बॅँकेच्या सभेत अंडी फेकल्याने सभासद दिपक चौगुले, विकास कुभांर या दोघांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. सभासदांनी त्यांचे सभासदत्व रद्द करण्याची मागणी केली. अध्यक्ष विनायक शिंदे यांनी दोघांचे सभासदत्व रद्द करत असल्याचे जाहीर केले.

  मागील संचालकांच्या कारभाराची चौकशी
  विनायक शिंदे म्हणाले, वर्षभरात बँकेचा व्यवसाय शंभर कोटींनी वाढला आहे. नवीन इमारत बांधकामास सभासदांचा पाठींबा आहे. तसेच पुढील एक दोन वर्षात सभासदांच्या अपेक्षेप्रमाणे लाभांश दिला जाईल. बॅकेचा कारभार काटकसरीने केल्यानेच कर्जाचा व्याजदार एक अंकी करूनही बँकेचे साडे चार कोटींचा नफा झाला आहे. बोनस व बक्षीस पगारासाठी एक रुपयांची तरतूद केली नाही. बँकेत नवीन एकही कर्मचारी भरलेला नाही. संगणक, स्टेशनरीवरील खर्च अवघा आठ लाख रूपयांवर आणला. मागील संचालकांनी जाता केलेला बक्षीस पगार व अन्य केलेल्या खर्चाची चौकशी करून संबधीतांवर कारवाई करणार आहे.

  विरोधकांच्या प्रश्नांनाही उत्तरे
  विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सभा शांततेत चालवली. यावेळी सत्ताधाऱ्यांसह विरोधी सभासदास महेश शरनाथे यांच्या प्रश्नांनाही विनायक शिंदे यांनी उत्तर दिले. शरनाथे यांनी विरोधी संचालकांना प्रोसेडिंग का दिले जात नाही असा जाब विचारला. यावर शिंदे यांनी ही चुकीची माहिती असल्याचे सांगत विरोधी संचालकांना प्रोसेडिंग दिले जात मात्र ते पोहच दिते नाही आण बाहेर मात्र प्रोसेडिंग मिळत नसल्याचे सांगताता असा खुलासा केला. यावेळी मृत संजिवनी योजनेबाबातही विरोधी सभासदांनी विचारालेल्या प्रश्नास उत्तरे देण्यात आले.

   विरोधकांची समांतर सभा, न्यायालयात जाणार
  विरोधकांनी समांतर सभा घेत सत्ताधाऱ्यांचा निषेध करत १ कोटी ५५ लाख इमारत वर्ग निधीच्या ठरावास विरोध केला. सत्ताधाऱ्यांनीच भ्रष्ट कारभार दडपण्यासाठी सभागृहाच्या पाठीमागच्या बाजूने फक्त समर्थक आत सोडले. महिला सभासदांची ढाल करून त्यांच्या आड दडण्याचा प्रयत्न केला. सत्ताधाऱ्यांनीच सभा गडबडीत घेऊन विषय मंजूर करणेसाठी त्यांच्याच समर्थकांकरवी अंडी फेकली. खापर मात्र विरोधकांवर फोडल्याचा आरोप बँक बचाव समितीचे निमंत्रक यु. टी. जाधव यांनी केला. यावेळी सदाशिव पाटील, शशिकांत बजबळे, मुकुंद सुर्यवंशी, संतोष कदम, महेश शरनाथे आदि उपस्थित होते.

  विरोधकांनी सभेतून काढता पाय घेतला, विरोधी विरोधी गटाच्या भूलथापांना सामान्य सभासद बळी पडला नाही, बोटावर मोजण्या इतक्या अल्प संख्येने आलेल्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या मोठ्या संख्येपुढे न थांबता सभेतून पळ काढला. संसाराचा गाडा काटकसरीने उडणाऱ्या महिला जर शिक्षक बँकेच्या सभेसाठी एवढ्या मोठ्या संख्येने येत असतील तर शिक्षक बँकेचा कारभार निश्चितच कौतुकास्पद आहे. आम्हीही विरोधक म्हणून काम केलेले आहे. यापूर्वी आम्ही सभा उधळून लावलेल्या आहेत; परंतु अंडी फेक टोमॅटो फेक अशी शिक्षकांच्या देशाला काळीमा फासणारी कृत्ये कधीही केली नाही.

  - अविनाश गुरव