Hundreds of hectares of crops affected by low voltage, farmers abandon cattle in summer crops due to lack of water

शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग, सोयाबीन व मुगाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. विहिरीला, नदीला पाणी आहे. पण, विजेच्या कमी दाबामुळे सिंचनाकरिता बसवलेल्या मोटारी बंद पडल्या. परिणामी, येथील शेकडो हेक्टरवर पेरलेली उन्हाळी पिके सुकली आहेत.

  चुरणी : चिखलदरा तालुक्यातील ढाकणा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या सहा गावातील शेकडो हेक्टरवरील उन्हाळी पिकाला विजेच्या कमी दाबासह पाण्याच्या अभावामुळे फटका बसला आहे. सोयाबीन, मूग व भुईमूग पिके नष्ट होऊ लागली असून शेतकऱ्यानी तोंडावर आलेल्या उभ्या पीकात  गुरे सोडली आहेत.

  चिखलदरा तालुक्यातील ढाकणा फिडर अंतर्गत दांभिया, ढाकणा, भांडूम, बेडाटकी व सावऱ्या अशी गावे येत असून या गावातील शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग, सोयाबीन व मुगाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. विहिरीला, नदीला पाणी आहे. पण, विजेच्या कमी दाबामुळे सिंचनाकरिता बसवलेल्या मोटारी बंद पडल्या. परिणामी, येथील शेकडो हेक्टरवर पेरलेली उन्हाळी पिके सोकली आहेत.

  शेतकरी शेतात राबून कष्टाने पेरणी करतो. घरात असलेले भांडे सावकाराकडे गहाण ठेवले. काहींनी बँकेचे कर्ज घेतले व आपल्या शेतात चांगले पिक येईल या आशेने महागळी बियाणे घेऊन शेतकऱ्यानी पेरणी केली. पेरणी नंतर पिके उगवली, चांगली डोलदार दिसू लागली पण, ऐन फुलोरा व फळधारणा करण्याच्या स्थितीतच महावितरण कडून विजेच्या लो व्होल्टेजमुळे सिंचन करणाऱ्या मोटारी बंद पडल्या. परिणाम सर्व पिके सुकली आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांनी रागाच्या भरात गावातील जनावरे उभ्या पिकात सोडली आहे.

  म्हणून गुरे सोडली –  प्रेमानंद कांशीराम जाधव, शेतकरी

  चार एकरात उन्हाळी भुईमूग व सोयाबीनची पेरणी केली. त्याकरिता मला एकरी २० हजार रुपये खर्च आला. पण वीज वितरण कंपनीचा नाकर्तेपणा व लो व्होल्टेजच्या परिणामामुळे मोटारी बंद झाल्या. त्यामुळे, पाण्याअभावी पिके सुकली आहे. म्हणून मी माझ्या चार एकरात गुरे सोडलीत.

  सुरजलाल भयालाल दहिकर – शेतकरी

  सर्व गावकऱ्यांनी ग्रामपंचायतला ठराव घेऊन वीज वितरण कंपनी धारणीला लो व्होल्टेज वाढवा म्हणून निवेदन दिले. आमदारांना तोंडी सांगितले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.