शेतातील गवताच्या गंजीला आग लावल्याच्या संशयातून पती-पत्नीस मारहाण; दहा जणांवर गुन्हा दाखल

शेतातील गवताच्या गंजीला आग लावल्याचा आरोप करुन पती-पत्नीला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करुन दुखापत केली. या तक्रारीवरुन दहा लोकांविरोधात दंगलीचा गुन्हा वणी पोलिसांनी दाखल केला.

    वणी : शेतातील गवताच्या गंजीला आग लावल्याचा आरोप करुन पती-पत्नीला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करुन दुखापत केली. या तक्रारीवरुन दहा लोकांविरोधात दंगलीचा गुन्हा वणी पोलिसांनी दाखल केला.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील सुरेश पंढरीनाथ गाडे यांच्या शेतजमीन गट क्रमांक ३११ मध्ये गवताची गंजी होती. त्यास अचानक आग लागली. यात सर्व गवत आगीच्या भक्षस्थानी पडले व मोठी आर्थिक हाणी गाडे यांची झाली. ही आग लगतच्या मोरे कुटुंबियांनी लावली असा संशय घेत सुरेश पंढरीनाथ गाडे, महेश सुरेश गाडे यांच्यासह इतरांनी मंडळी जमवून फिर्यादीच्या शेतात प्रवेश करुन नामदेव मोरे व मोरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

    तसेच लाठ्याकाठ्याने मारहाण करुन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची फिर्याद देण्यात आली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला.