पतीची गळफास घेऊन तर पत्नीची विष प्राशन करून आत्महत्या; चांदवड तालुक्यात प्रचंड खळबळ

तालुक्यातील परसूल येथील पतीने घराच्या छताला गळफास घेत तर पत्नीने विषारी औषध सेवन करत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.२४) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती कामगार पोलीस पाटील सोनाली विजय सोनवणे यांनी चांदवड पोलिसांत दिल्याने अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

    चांदवड : तालुक्यातील परसूल येथील पतीने घराच्या छताला गळफास घेत तर पत्नीने विषारी औषध सेवन करत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.२४) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती कामगार पोलीस पाटील सोनाली विजय सोनवणे यांनी चांदवड पोलिसांत दिल्याने अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, परसूल गावच्या शिवारातील मळ्यात भाऊसाहेब एकनाथ बरकले (३७) व पत्नी सुनिता (३०) हे राहत होते. शुक्रवार (दि.२४) रोजी दुपारच्या सुमारास भाऊसाहेब एकनाथ बरकले याने घराच्या छताला गळफास घेतल्याचे एकाने पाहिले असता त्यांनी पोलीस पाटील यांना माहिती दिली.

    त्यावेळी पोलीस पाटील, स्थानिक नागरिक व पोलीस यांनी घटनास्थळी पोहचले. यावेळी पती भाऊसाहेबने गळफास तर पत्नी सुनिता हिने विषारी औषध सेवन केल्याने मयत झाल्याचे निदर्शनास आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.