पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्त्या, अंगावर पेट्रोल ओतून घेतलं जाळून

काल रात्रीच्या सुमारास त्याचा मृतदेह हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावाजवळील भिवकुंड नाला परिसरात आढळला.

    नागपूर : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना नेहमी समोर येत असतात. पण नागपुरातुन एक विचित्र घटना समोर आली आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केली आहे. अयोध्यानगर परिसरात ही घटना घडली आहे. राहुल बोरीकर (वय, ४५) असं मृतकाचं नाव आहे.

    अयोध्यानगर येथील दुर्गा नगर मध्ये राहणारा राहुल हा बुटीबोरी येथील निलकमल कंपनीत नोकरी करून नोकरी करत होता. दहा महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. काल रात्रीच्या सुमारास त्याचा मृतदेह हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावाजवळील भिवकुंड नाला परिसरात आढळला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो रुग्णलायात पाठवला. पोलिसांनी तपास केला असता अंगावर पेट्रोलजन्य पदार्थ टाकून जाळून घेतल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. तसेच त्याची बॅग परिसरातील झाडाला लटकवलेली आढळली. या बॅगमध्ये ‘सुसाईड नोट’ आढळून आली. पत्नी वारंवार धमकी देत असल्याने त्रस्त झाल्याचे ‘सुसाईड नोट’मध्ये लिहून ठेवले आहे. ही सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.