मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला गेलेल्या पत्नीचा पतीकडून खून

पत्नी पत्नी मध्ये जुन्या गोष्टीवरून वाद झाला. यावेळी संतापलेल्या पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार करत तिची हत्या केली.

    नागपूर : पतीपासून वेगळं राहत असलेली पत्नी आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गेली, पण नवऱ्यानं जुना वाद उकरून काढतं तिची हत्या केली. नागपुरातील (Nagpur Crime) लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे.

    ६० वर्षीय रामदास बोरीकर आपल्या पत्नी मुलांपासून वेगळे राहत होते. सतीश बोरीकर आणि राकेश बोरीकर अशी दोन मुलांची नावं आहेत. शनिवारी सकाळी त्यांची पत्नी छाया बोरीकर मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी त्यांच्याकडे आली. यावेळी पत्नी पत्नी मध्ये जुन्या गोष्टीवरून वाद झाला. यावेळी संतापलेल्या पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार करत तिची हत्या केली.