स्वत:च्या चिमुकल्यांसमोर केली पत्नीची हत्या, आरोपी पतीला अटक

काही दिवसांपूर्वीचं तिने सुरक्षा रक्षकाचे काम सुरू केले होते. अंकिता सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होती. त्याठिकाणी सचिन मुलांना घेऊन अंकीताला भेटायला आला. त्यावेळी सचिनने अंकिताला सोबत घरी चालण्यासाठी तगादा लावला मात्र,  अंकिताने नकार देताच आरोपीने चाकूने अंकिताच्या पोटावर वार केले.

    नागपूर :  पतीने कौटुंबिक वादातून स्वतःच्या पत्नीची दोन चिमुकल्या समोर चाकूने वार करून हत्या (Husband kills wife over family dispute)केल्याची घटना सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिवनगाव फाटा भागात उघडकीस आली आहे. अंकिता भगत असे मृत महिलेचे नाव आहे तर सचिन भीमराव भगत असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

    अंकिताने सुमारे ८ वर्षांपूर्वी सचिन सोबत प्रेम विवाह केला होता. दोघांना दोन मुले आहेत. काही वर्षांपूर्वी सचिन दारूच्या आहारी गेल्याने त्यांच्या हातचे काम देखील सुटले होते. दारूचे व्यसन जडल्यामुळे आरोपी सचिनला कुठलही काम मिळत नव्हते. त्यामुळे सचिन आणि अंकिता मध्ये अनेक वेळा खटके उडायचे. सचिनकडून सतत होत असलेल्या छळामुळे अंकिताने तीन महिन्यांपूर्वी घर सोडले. काही दिवसांपूर्वीचं तिने सुरक्षा रक्षकाचे काम सुरू केले होते. अंकिता सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होती. त्याठिकाणी सचिन मुलांना घेऊन अंकीताला भेटायला आला. त्यावेळी सचिनने अंकिताला सोबत घरी चालण्यासाठी तगादा लावला मात्र,  अंकिताने नकार देताच आरोपीने चाकूने अंकिताच्या पोटावर वार केले.

    पत्नीला जखमी करून पती पसार

    आरोपी सचिनने जखमी अवस्थेत अंकिताला सोडून पळ काढला. यावेळी काम करणाऱ्या मजदुरांनी अंकिताला रुग्णालयात नेलं मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. विशेष म्हणजे ही आरोपीने दोन्ही चिमुकल्यांन समोरच त्यांच्या आईच्या पोटात चाकू भोकसला. काय झालं हे कळण्याआधीचं आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून दोन्ही मुलांना बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं आहे.