नॉन इंटरलॉकिंगमुळे हैदराबाद-जयपूर रेल्वे रद्द; प्रवाशांना बसणार फटका

पश्चिम मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागातील रामगंज मंडी-भोपाळ रेल्वे विभागादरम्यान असलेल्या संत हिरडा रामनगर स्थानकावर नॉन-इंटरलॉकिंगचे काम केले जात आहे. या कामासाठी काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. यात अकोला मार्ग धावणाऱ्या तीन रेल्वे आहेत.

    अकोला : पश्चिम मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागातील रामगंज मंडी-भोपाळ रेल्वे विभागादरम्यान असलेल्या संत हिरडा रामनगर स्थानकावर नॉन-इंटरलॉकिंगचे काम केले जात आहे. या कामासाठी काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. यात अकोला मार्ग धावणाऱ्या तीन रेल्वे आहेत.

    यापैकी हैदराबाद- जयपूर सुपरफास्ट ट्रेन – क्रमांक 12720, हैदराबाद- जयपूर 27 डिसेंबर, 1 जानेवारी आणि 3 जानेवारी रोजी रद्द राहील. ट्रेन क्रमांक 12719, जयपूर-हैदराबाद 29 डिसेंबर, 3 जानेवारी 24 आणि 5 जानेवारी 2024 रोजी रद्द राहील. हैदराबाद- जयपूर विशेष ट्रेन क्रमांक 07115, हैदराबाद- जयपूर 29 डिसेंबर, 23 रोजी रद्द राहील. ट्रेन क्रमांक 07116, जयपूर-हैदराबाद 31 डिसेंबर रोजी रद्द राहील. तर ट्रेन क्रमांक 19713, जयपूर-कुर्नूल सिटी रेल्वे 30 डिसेंबर रोजी जयपूरहून नियमित मार्ग सवाई माधोपुर कोटा-नागदा-संत हिरदाराम नगर- ऐवजी परिवर्तित मार्ग सवाई माधोपूर- सोगरिया बीना भोपाल मार्गाने धावेल.

    ट्रेन क्रमांक 19714, कुर्नूल सिटी -जयपूर ट्रेन सेवा, 1 जानेवारी 2024 रोजी कुर्नूल सिटीहून नियमित मार्ग भोपाल-संत हिरदारामनगर नागदा कोटा- सवाई माधोपुरऐवजी परिवर्तित मार्ग भोपाल- बीना सोगरिया सवाई माधोपूर मार्गाने धावेल.