मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘मी देणारा आणि घेणारा देखील, ठाकरेंना काय दिले, हे सांगायची वेळ येऊ देऊ नका’

महाराष्ट्रात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यात शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले आहेत. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्रात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यात शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले आहेत. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. ‘ठाकरेंना काय दिले, हे सांगायची वेळ येऊ देऊ नका’, असे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांना काय दिले, हे सांगायची वेळ येऊ देऊ नका. आपल्याला संपत्तीचा आणि प्रॉपर्टीचा मोह कधीही नव्हता. राहणार देखील नाही. कोणाचीही संपत्ती, कोणाची मालमत्ता आम्हाला नको आहे. आम्ही कुठलाही दावा केला नाही. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

…ते सांगायची वेळ येऊ देऊ नका

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या देवघरातला बाण दाखवला होता. मात्र, तो बाण देखील एकनाथ शिंदे यांनीच दिला असल्याची चर्चा होती. त्याबाबत शिंदे म्हणाले की, मी काय काय दिले हे सांगायची वेळ येऊ देऊ नका. मी देणारा आहे आणि घेणारा देखील आहे. मात्र, मी काय दिले ते सांगायची वेळ येऊ देऊ नका.

बाळासाहेबांची भूमिका घेतली…

शिवसेना-भाजप युतीच्या मनातली भूमिका आम्ही घेतली. बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आम्ही घेतली आहे. त्यामुळे राज्यात साडेसात हजार ग्रामपंचायतीपैकी साडेचार ग्रामपंचायत शिवसेना युतीच्या आलेल्या आहेत. लोकांनी आम्हाला स्वीकारले असल्याचे ते म्हणाले.