“मी कुणाला घाबरत नाही… कोई मुझे पसंद करे या ना करे”, पंकजा मुंडे यांचा इशारा कुणाला? पुढे म्हणाल्या…

अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंकजा मुंडे यांनी या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी पक्षालाच इशारा दिला आहे. “कोई मुझे पसंद करे या ना करे… या जगात मी कुणालाच घाबरत नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

    बीड: भाजपाच्या (BJP) महिला नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) ह्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे ह्या पक्षापासून दुरावला गेल्या असल्याचं चित्र आहे. मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपातील अनेक कार्यक्रमात दिसल्याच नाहीत. तसेच त्यांनी भगवान गडावर उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. यानंतर जे पी नड्डा यांच्या मराठवाड्यातील कार्यक्रमात पंकजा मुंडे यांचे निमंत्रण पत्रिकेवर नावच नव्हते, या कार्यक्रमात मुंडे भगिनाना निमंत्रण नसल्यामुळं मुंडे समर्थक नाराज झाले आहेत, पंकजा मुंडेंना डावलले जाते का? पंकजा मुंडे पक्ष सोडणार का? अशी चर्चां सुरु आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule)  एका कार्यक्रमात पंकजा मुंडेंना बोलू दिले नाही, तो व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. दरम्यान, पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा पक्षाला इशारा देत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

    कोई मुझे पसंद करे या ना करे

    दरम्यान, अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंकजा मुंडे यांनी या स्नेहसंमेलनाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी पक्षालाच इशारा दिला आहे. “कोई मुझे पसंद करे या ना करे… या जगात मी कुणालाच घाबरत नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा निशाणा नेमका कुणावर आहे? त्यांच्या बोलण्याचा कल पक्षावर की पक्षातील कुठल्या नेत्यावर? अशी चर्चा आता रंगली आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरेही दिली. यावेळी झालेल्या भाषणात पंकजा मुंडे नेमक्या कोणाला घाबरतात याचं रहस्य त्यांनी उलगडले आहे.

    …पण मी माझ्या मुलाला घाबरते

    पुढे बोलताना पंकजा म्हणाल्या की, मी या जगात कोणालाही घाबरत नाही. पण माझा मुलगा आर्यमान याला खूप घाबरते. कारण आजच्या पिढीची बुद्धी फार तीक्ष्ण आहे. त्यामुळे वाद घालण्यात अर्थच नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी ड्रग्स पासून दूर राहा असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. ड्रग्स आतंक वादापेक्षाही घातक असल्याचं त्यांनी म्हटलंय. समाजात घडणाऱ्या काही अप्रिय घटनेवर पंकजा मुंडे यांनी चिंता व्यक्त केली.