OBCs Eagerly waiting got justice says pankaja munde on political reservation for obc nrvb

मी संघर्षाला घाबरत नाहीय, माझा मेळावा हा कष्टकऱ्यांचा आहे, असं पंकजा म्हणाल्या. तसेच नेत्याला पद मिळावं ही कार्यकर्त्यांची भावना असते. त्यात चूक काय आहे. माझा मेळावा चिखल फेकणाऱ्यांचा नाही. मी शत्रुलाही वाईट बोलत नाहीय, तर वारसा चालविणाऱ्यांना वाईट कसं बोलेन असं पंकजा बोलल्या.

    बीड – आज दसरा तसेच विजयादशमी आहे, आज राज्यभरात राजकीय नेत्यांचे अनेक मेळावे होत आहेत, मुंबईत शिवसेनेचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Dasara melava) होत आहे, तर बीकेसीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाचा दसरा मेळावा होत आहे. दुसरीकडे भाजपा (BJP) नेत्या पंकजा मुंडे यांचा भगवान गडावर पारंपरिक दसरा मेळावा होत आहे. दरम्यान, पंकजा मुंडे (pankaja munde) नाराज असल्याचं बोललं जात असताना, पंकजा मुंड काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते.

    दरम्यान, आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी अनेक विषयाना हात घातले. मी संघर्षाला घाबरत नाहीय, माझा मेळावा हा कष्टकऱ्यांचा आहे, असं पंकजा म्हणाल्या. तसेच नेत्याला पद मिळावं ही कार्यकर्त्यांची भावना असते. त्यात चूक काय आहे. माझा मेळावा चिखल फेकणाऱ्यांचा नाही. मी शत्रुलाही वाईट बोलत नाहीय, तर वारसा चालविणाऱ्यांना वाईट कसं बोलेन असं पंकजा बोलल्या. पुढे बोलताना पंकजा म्हणाल्या की, माझा मेळावा कष्टकऱ्यांचा आहे, कष्टकऱ्यांना चांगले दिवस यावेत, जोडे उचलणाऱ्यांचे नाव होत नाही, मी थकणार नाहीय, झुकणार नाही असा इशारा सुद्धा पंकजांनी विरोधकांनी दिला.