“मी काही मागत नाही, तेवढं बेळगाव देऊन टाका…” सीमावादावर शरद पवारांची मिश्किल टिप्पणी अन् कार्यक्रमात पिकला एकच हशा, पुढे म्हणाले…

या रुग्णालयाचे अध्यक्ष प्रभाकर कोरे हे मुळचे बेळगावचे असून, ते शरद पवारांचे चांगेल मित्र आहेत. या कार्यक्रमात शरद पवार भाषणात म्हणाले की, मी काही मागत नाही, तेवढं बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवा असं म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पिकला.

    पुणे- दोन महिन्यापूर्वी कर्नाटकचे (Karanataka) मुख्यमंत्र्यांनी महाराष्टातील काही गावांवर दावा केल्यानंतर व बेळगावात (Belgaum) कन्नड वेदिकेच्या संघटनेनं महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड केल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक पेटला होता. मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरु आहे. हा वादा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, अधूनमधून दोन्ही राज्यात याचे वादाचे पडसाद उमटत असतात, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) सीमावादवर व  बेळगावावर मिश्किल टिप्पणी केली आहे.

    पिंपरी चिंचवड येथे एका खासगी रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. या रुग्णालयाचे अध्यक्ष प्रभाकर कोरे हे मुळचे बेळगावचे असून, ते शरद पवारांचे चांगेल मित्र आहेत. या कार्यक्रमात शरद पवार भाषणात म्हणाले की, मी काही मागत नाही, तेवढं बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवा असं म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पिकला. प्रभाकर कोरे यांनी म्हटलं की, शरद पवार सतत बेळगाव कधी देणार, साहेब आम्ही मुंबई प्रांतातील आहोत. माझ्या सर्व संस्था या मुंबईत आहेत. म्हणून मी साहेबांना म्हणत असतो, घ्यायचे असेल तर पूर्ण कर्नाटक घ्या, बेळगाव नको.

    शरद पवार कोरेंना म्हणाले की, तुमची इतकी उद्घाटनं मी केली. मी काही मागत नाही. तो बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवून टाका, असं मिश्किल विधान शरद पवार यांनी केलं. तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला. ते नेहमी सांगतात अख्खा कर्नाटक तुम्ही घ्या. पण बेळगावची मागणी करू नका. वैद्यकीय क्षेत्रात ज्या काम करणाऱ्या उत्तम संस्था आहेत त्यात कोरे यांची संस्था आहे. ही संस्था बेळगावमध्ये चांगलं काम करत आहे. त्याचा परिणाम म्हणजे बेळगावमधील सर्व घटकांचा यांच्या संस्थेवर विश्वास आहे, बेळगावमधील जनतेची ते आरोग्याच्या दृष्टीने ते काळजी घेताहेत, असं शरद पवार म्हणाले.