‘I beg you’, आर्यनच्या अटकेवेळी शाहरुखनं समीर वानखेडेंकडे 10 ते 12 वेळा मागितली भीक, दोघांतील महत्त्वाचे 10 चॅट्स

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise Drug Party Case) आर्यन खानला (Aryan Khan) अटक झाल्यानंतर अभिनेता शाहरुख खानचं (Shahrukh Khan) संपूर्ण कुटुंब धास्तावून गेलेलं होतं. त्यावेळी एननसीबीचे विभागीय संचालक असलेल्या समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि शाहरुख खान यांचे अटक प्रकरण काळातील व्हॉट्सअप चॅट (WhatsApp Chat) आता समोर आले आहेत.

    मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai Cruise Drug Party Case) आर्यन खानला (Aryan Khan) अटक झाल्यानंतर अभिनेता शाहरुख खानचं (Shahrukh Khan) संपूर्ण कुटुंब धास्तावून गेलेलं होतं. त्यावेळी एननसीबीचे विभागीय संचालक असलेल्या समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि शाहरुख खान यांचे अटक प्रकरण काळातील व्हॉट्सअप चॅट (WhatsApp Chat) आता समोर आले आहेत. वानखेडे यांनी कोर्टात याचिका सादर केली. त्यात ते चॅट्स जोडण्यात आलेले आहेत. शाहरुख आणि त्याचा परिवार इतके घाबरुन गेले होते की, या काळात सातत्यानं व्हॉट्सऍपवरुन शाहरुख वानखेडेंच्या संपर्कात होता. या उघड झालेल्या चॅटमध्ये आर्यनसाठी आणि त्याला सोडवण्यासाठी 8 वेळा भीक मागत असल्याचा उच्चार शाहरुखनं केला आहे.

    व्हॉट्सअप चॅटमधील 10 महत्त्वाचे मुद्दे

    1.मी भीक मागतो की त्याला जेलमध्ये राहू देऊ नका. सुट्ट्या लागल्यानंतर माणूस म्हणून तो कोलमडून पडेल. त्याचं ह्रद्य तुटेल. तुम्ही आश्वासन दिलं होतंत की मुलाला सुधारेन. त्याला अशा ठिकाणी पाठवणार नाही, ज्या ठिकाणी तो तुटून आणि विस्कळीत होऊन बाहेर येईल. यात त्याची काहीही चूक नाहीये.

    2. मी आश्वासन दोते की मी त्या लोकांकडे जाऊन भीक मागेन. तुमच्यासमोर आणखी काही म्हणून नका हेही मी त्यांना सांगेन. मी माझ्या शक्तिप्रमाणे जे शक्य आहे ते करेन, त्यामुळं ते माझं म्हणणं ऐकावेत. त्यांनी तुमच्याबद्दल जे बोलले आहेत ते त्यांनी परत घ्यावं, असंही मी त्यांना सांगेन. हे सगळं मी करीन याचं आश्वासन देतो. हे थांबवण्यासाठी कुणाकडेही भीक मागण्यात मागे राहणार नाही. प्लिज माझ्या मुलाला घरी पाठवा, प्लीज प्लीज एक बाप म्हणून मी तुमच्याकडे ही भीक मागतो आहे.

    3. आमचं ह्रद्य तोडू नका. ही एका बापाची दुसऱ्या बापाकडे विनंती आहे. मीही माझ्या मुलावर तितकंच प्रेम करतो, जितकं तुम्ही तुमच्या मुलावर करता. माझा स्वतावर आणि व्यवस्थेवर असलेला विश्वास तुटू देऊ नका. प्लिज यातून आमचं सगळं कुटुंब कोलमडून पडेल. तुम्ही मदतीचा जो प्रयत्न केलात त्याबाबत धन्यवाद. मी तुमचा खूप आभारी आहे. लव्ह शाहरुख खान

    4. तुम्ही जेव्हा सांगितलं होतं की आर्यनला एक चांगला माणूस करता आहात, मी त्या वक्तव्यावर विश्वास ठेवला. या तपासात मी कोणत्याही प्रकारे माझ्या मुलाची मदत केलेली नाही. ना प्रेससमोर गेलो, ना माध्यमांत काही म्हणालो. कारण तुमच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे. प्लिज तुम्ही माझ्या मुलीशी बोलू शकाल का

    5. मी आश्वासन देतो की येणाऱ्या काळात मी तुमच्यासाठी नेहमी उभा राहीन. आणि तुम्ही जे चांगलं करु इच्छिता त्यात तुम्हाला मदत करीन. हे एका माणसाचं वचन आहे. तुम्ही मला इतकं तर नक्की ओळखताच की मी हे आश्वासन नक्की पूर्ण करीन.

    6. मी तुमच्यासमोर भीक मागतोय की प्लिज माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर दया दाखवा. आम्ही खूप साधे आहोत. माझा मुलगा थोडा भरकटला आहे मात्र एखाद्या अपराध्याप्रमाणे जेलमध्ये राहणं तो डिझर्व्ह करत नाही. तुम्हालाही हे माहीत आहे. प्लिड थोडी दया दाखवा मी तुमच्यासमोर पाया पडतो.

    7. एक कायदेशीर अधिकारी म्हणून तुमची इमानदारी न सोडता आमची काही मदत करु शकत असाल, तर प्लिज ती करा. मी नेहमीच यासाठी तुमचा आभारी राहीन. मला टेक्निकल बाबी माहीत नाहीत. मात्र तुम्हाला आणि तुमच्या विभागाला जे ठिक वाटतंय ते.

    8. मी आश्वासन देतो की, तुम्हाला त्याच्याकडून काहीही मदत लागणार असेल तर तो ती करील. कोणत्याही नकारात्मक प्रतिमेशिवाय आमचं कुटुंब त्याला घरी आमू इच्छितं. भविष्यात त्याला ते जास्त उपयोगी पडेल. पिता म्हणून मी तुन्हाला ही विनंती करतो आहे. धन्यवाद

    9. माझा मुलगा या सगळ्यात सहभागी नव्हता. हे तुम्हालाही माहीत आहे. जर त्यानं काही चूक केली असेल तर ती नगण्य रुपाची आहे, हेही तुम्हाला माहीत आहे. प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडतो आणि सांगतो की माझ्याकडे असे काहीही नाही जे तुमचं अहित करेल. मी तुमच्यासमोर हात जोडून सांगू इच्छितो की माझ्या मुलाला कोणत्याही राजकारणात अडकवू नका.

    10. तुमच्याकडे भीक मागतो. आमच्यासाठी ही फार मोठी बाब आहे. माझं कुटुंब, मुलगा या सगळ्यांना यात जाणीवपूर्वक अडकवण्यात येतंय. मी सगळ्यांशी बोलण्यापासून स्वताला वाचवतोय. मी काहीच बोलू इच्छित नाहीय. उलट मी सगळअयांना सांगितलंय की माझ्या वतीनं कुठलंही स्टेटमेंट देऊ नका. मी हे शपथेवर सांगतोय. मी भाक मागतोय सर. माझा मुलगा यात सामील नाही. तुम्ही प्लिज तुमच्या माणसांना सांगा की थोडं सबुरीनं घ्या.