गेली २० वर्षे झाली मी आपली सेवा करत आहे, म्हणून आज आमदार आणि मंत्री झालो : धनंजय मुंडे

धनंजय मुंडे बोलतांना म्हणाले की, गेली 20 वर्षापासून मी या मतदार संघातील जनतेची अविरत सेवा करत आहे यांचे आशीर्वाद म्हणजे साक्षात देवाचे आशीर्वाद आहेत आणि यांच्यामुळेच मी आज आमदार आणि मंत्री बनू शकलो असल्याचे ते म्हणाले.

    बीड : परळी मतदार संघातील गरीब जनतेच्या रेशन कार्ड वाटप कार्ड ची दुरुस्ती नाव वाढविणे सेवा सप्ताह कार्यक्रम प्रसंगी बोलतांना राज्याचे सामजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे बोलतांना म्हणाले की, गेली 20 वर्षापासून मी या मतदार संघातील जनतेची अविरत सेवा करत आहे यांचे आशीर्वाद म्हणजे साक्षात देवाचे आशीर्वाद आहेत आणि यांच्यामुळेच मी आज आमदार आणि मंत्री बनू शकलो असल्याचे ते म्हणाले.

    तर पुढे बोलतांना धनंजय मुंडे म्हणले की, एकदाचा मंत्री झालो म्हणून मी या जनतेला कसा विसरेल. मी कायम यांच्या ऋणात राहू इच्छितो, म्हणत पंकजा मुंडे यांना टोला लगावला.

    पुढे बोलतांना मुंडे म्हणाले की, नवीन रेशन कार्ड फक्त वाटप न करता याबाबत आपल्याला आणखी काही लागत असेल ते सर्व देण्याचे मी आज आपल्याला शब्द देतो, असे देखील म्हणाले. कोविडच्या काळात ज्या हाताला कामे नव्हती त्या घरात राशेन पुरवण्याचे आम्ही काम केले गरजूंना मदत केली. दवाखाच्या बाबतीत ही आम्ही दिवसरात्र आम्ही आपल्या सेवेत आहोत आणि पुढेही आपल्या सेवेत असणार असल्याचा ही या प्रसंगी बोलतांना परळी मतदार संधातील जनतेला शब्द दिला.

    तसेच धनंजय मुंडे म्हणले की, आज जे ही मी अपल्यासाठी करतोय ते काही वेगळं करत नाही ते माझे कर्तव्य आहे तो माझा धर्म आहे वेगळं काहीच नाही आणि मी हे आयुष्यभर करत राहणार आणि माझे सहकारी देखील आपली सेवा करतच राहणार असल्याचे ही धनंजय मुंडे म्हणाले.

    या प्रसंगी परळी तहसील कार्यालयाचे तहसीलदार, नायब तहसीलदार रुपनर उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, आयोजक डॉ संतोष मुंडे आदी सह पत्रकार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.