मनोज जरांगेंवर मी टीका केलेली नाही, मी गोपनाथ मुंडेंची औलाद आहे; पंकजा मुंडे

देशभरात सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच बारामती आणि बीड मतदार संघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

    देशभरात सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच बारामती आणि बीड मतदार संघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बीड मतदार संघात भाजप (BJP) विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) अशी महत्वपूर्ण लढत होणार असल्याने सगळ्यांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. बीडमध्ये आता मनोज जरांगे विरुद्ध पंकजा मुंडे (Pankaja Munde) अशी लढत होणार आहे. यावरून राज्याच्या राजकारणात अनेक वाद निर्माण झाले आहेत. मी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली नाही, आणि जर टीका केली तर कधीच शब्द मागे घेत नाही, मी गोपीनाथ मुंडेंची औलाद आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. गरींबांसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंवर टीका आम्ही केली नसल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.

    पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये मराठा आरक्षणावर वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आपण मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली नाही, असे देखील पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. गेवराई तालुक्यातल्या उमापूरमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत त्यांनी सांगितले आहे.

    भाजपकडून पकंजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज त्याच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, वर्षभरात मी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे नाव देखील काढले नाही. ज्यांच्यावर मोठ्या आवाजात बोलायचं आहे त्यांच्यावर मी मोठ्या आवाजात बोलते. मी जर टीका केली तर मी कधीच माझा शब्द मागे घेणार नाही, मी गोपीनाथ मुंडेंची औलाद आहे. गरिबांसाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटलांवर मी टीका केलेली नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

    मला वंचितांसाठी आणि पीडितांसाठी काम करायचे आहे. वंचित आणि पीडितांची वाली होईन अशी शपथ मी गोपीनाथ मुंडे यांच्या चितेवर घेतली होती आणि वंचितांच्या बाजूने उभे राहण्यासाठी मी कोणालाही घाबरत नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.