‘त्या’बाबत मला काहीही माहिती नाही ; मंत्री वळसेंनी बोलणे टाळले

अजित पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष करण्यासाठीच खा. शरद पवार यांनी बैठक बोलावली होती. मात्र, अजित पवार यांनीच नकार दिल्याचा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केला होता. त्याबाबत मला काहीही माहिती नाही, असे सांगत सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी बोलणे टाळले.

    सातारा :  अजित पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष करण्यासाठीच खा. शरद पवार यांनी बैठक बोलावली होती. मात्र, अजित पवार यांनीच नकार दिल्याचा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केला होता. त्याबाबत मला काहीही माहिती नाही, असे सांगत सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी बोलणे टाळले.

    मंत्री दिलीप वळसे-पाटील हे शनिवारी रयत शिक्षण संस्थेच्या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने साताऱ्यात आहेत. यावेळी पत्रकारांनी त्यांना जयंत पाटील यांच्या व्यक्तव्याबाबत प्रश्न विचारले. अजित पवार यांना अध्यक्ष करण्यासाठी खा. शरद पवारांनी बैठक बोलावली होती. मात्र, तेव्हा अजित पवार अध्यक्षपदी नको म्हणाले होते, असा गौप्यस्फोट पाटल यांनी केला होता. यावर दिलीप वळसे-पाटील म्हणाले, माझ्यासमोर अशी चर्चा झाली नव्हती. मला त्याबाबत काहीही माहीत नाही.

    खा. संजय राऊत हे ‘मोठे’ नेते

    खा. संजय राऊत हे मोठे नेते आहेत. ते नेहमीच वेगवेगळी विधान करत सल्ले देत असतात. प्रभू रामचंद्र हे सर्वांच्या अस्थेचा विषय आहे, त्यामुळे आपण देवाला देवाच्या जागी ठेऊया, असा सल्ला मंत्री वळसे पाटील यांनी खा. राऊत यांना दिला. भाजपने आता फक्त राम लल्लालाच निवडणुकीत उभे करायचे राहिले आहे, अशी टीका शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केली होती.