hasan mushrif

या छापेमारीत जवळपास 20 अधिकारी सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आज दिवसभर आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी आणि आयकर विभाग छापेमारी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, या छापेमारीनंतर आमदार हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया समोर आली असून, मी माहिती घेऊन बोलतो, असं मुश्रीफ म्हणाले आहेत.

    कोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर ईडी (ED) आणि आयकर विभागाने (Income Tax) धाडी टाकली आहे. आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल (kolhapur, kagal) येथील घरांवर पहाटे 6.30 वाजल्यापासून छापेमारी सुरु आहे. या छापेमारीत जवळपास 20 अधिकारी सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आज दिवसभर आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी आणि आयकर विभाग छापेमारी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, या छापेमारीनंतर आमदार हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया समोर आली असून, मी माहिती घेऊन बोलतो, असं मुश्रीफ म्हणाले आहेत.

    नेमकं काय आहे प्रकरण?

    कोल्हापूर जिल्ह्यातील कागल हा आमदार हसन मुश्रीफ यांचा मतदारसंघ आहे. कोल्हापुरातील आप्पासाहेब नलावडे, गडहिग्लज साखर कारखान्यात १२७ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच हा कारखाना आमदार हसन मुश्रीफ यांचे जावई अनधिकृतपणे चालवत होते. या कारखान्यात आमदार हसन मुश्रीफ यांचे जावई व स्वत: मुश्रीफ यांनी मिळून १२७ कोटींचा घोटाळा तसेच आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच याआधी देखील याची चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमय्यांनी केली होती. त्यानंतर आज आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, कागल, गडहिंग्लज या ठिकाणी सध्या ईडी छापेमारी करत आहे.

    काय आहेत किरीट सोमय्यांचे आरोप?

    हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केला असून, त्याबाबत 2700 पानांचा पुरावा इन्कम टॅक्सला दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि मुलावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. बोगस कंपन्या दाखवून बेनामी संपत्ती जमवल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला. बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि (CRM Systems PVT LTD ) ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ (Navid Mushrif) यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, 2 कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे. बाप बेटे दोघांच्या 127 कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत. हसन मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख रुपयांचे शेअर्स दाखवले आहे. 2018- 19 मध्ये इन्कम टॅक्सने मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. बेनामी ट्राझॅक्शन 127 कोटींचे व्यवहार समोर आले आहेत.