“शप्पथ सांगतो…, मिशाच काय भुवयाही काढून टाकेन”; उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंना खुलं आव्हान, स्पष्टच दिला इशारा…

मी कोणताही घोटाळा किंवा भ्रष्टाचार केला नाहीय. जर साताऱ्यातील एकाने जरी सांगितले तर, मी मिशाच काय भुवया देखील काढेन, अशी टोकाची भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे. तसेच यावेळी त्यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर टिका केली. या टिकेला आमदार शिवेंद्रसिंहराजे कसे उत्तर देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

सातारा : आपल्या रोखठोक व परखड बोलण्यासाठी साताराचे (Satara) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) प्रसिद्ध आहेत. दरम्यान, आता एक असेच एक आव्हानात्मक व परखड मत खासदार उदयनराजे भोसले मांडल्यामुळं याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. “एकाने जरी सांगितलं की उदयनराजेंनी भ्रष्टाचार केलाय, तर मी देवाची शप्पथ सांगतो…, मिशाच काय भुवया देखील काढून टाकेन”. असं आव्हानच खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Singh Raje bhosale) यांना दिलं आहे. त्यामुळं या आव्हानाला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे उत्तर देणार का, याकडे लक्ष लागले आहे.

काय म्हणले उदयनराजे?

पुढे बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, माझ्यावर जर आरोप सिद्ध झाले तर, पुन्हा आपलं तोंड दाखविणार नाही. लोकांची सेवा करण्याचा जो वसा आम्हाला मिळालाय तो आम्ही जपत आहोत. उलट तुमच्याकडून घराण्याला अशोभनीय कार्य घडत आहे’, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर केली आहे. मी कोणताही घोटाळा किंवा भ्रष्टाचार केला नाहीय. जर साताऱ्यातील एकाने जरी सांगितले तर, मी मिशाच काय भुवया देखील काढेन, अशी टोकाची भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे.

…तर त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार?

दरम्यान, ‘आम्हाला नावे ठेवा; पण तुम्ही सातारावासीयांसाठी काय केलं ते सांगा. मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगत आहे, तुम्ही एकदा समोरासमोर या. अगदी वेळ, वार, ठिकाणही तुम्हीच ठरवा. सातारा विकास आघाडीच्या वतीने गुरुवारी सायंकाळी विविध विकासकामांचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर जोरदार टीका केला. ‘ज्यांची बौद्धिक पात्रता खुजी आहे, त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार. त्यांच्याकडे टीका करण्यापलीकडे काहीच उरलेलं नाही. अशी बोचरी टिका खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर केली. त्यामुळं आता या टिकेला आमदार शिवेंद्रसिंहराजे कसे उत्तर देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.