“बाळासाहेबांशी झालेल्या संवादांचा मी नेहमीच आदर करेन; त्यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी वाहून घेतले”, पंतप्रधान मोदींचे ट्विट तर, राजकीय नेत्यांकडून बाळासाहेबांना अभिवादन

“बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…. त्यांच्याबरोबर झालेल्या संवादांचा मी नेहमीच आदर करेन,  त्यांना समृद्ध ज्ञान आणि बुद्धी लाभली होती. त्यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी वाहून घेतले.” असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

  मुंबई- आज हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्यामुळं राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. दरम्यान, आज विधानभवनात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त तैलचित्राचे अनावरण (सोमवार 23 जानेवारीला) आज होणार आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनी (Birth Annivesary) औचित्य साधत आज पंतप्रधान मोदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच राजकीय पक्षातील अनेक नेत्यांनी ट्विट करत बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.

  त्यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी वाहून घेतले- पंतप्रधान

  दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. “बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…. त्यांच्याबरोबर झालेल्या संवादांचा मी नेहमीच आदर करेन,  त्यांना समृद्ध ज्ञान आणि बुद्धी लाभली होती. त्यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी वाहून घेतले.” असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

  मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन…

  वंदनीय #हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे यांना जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन….असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे.

  मराठी माणसांच्या मनात स्वाभिमान जागृतपवार

  स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीत व कुंचल्यात सामाजिक व राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करण्याचे सामर्थ्य होते. आपल्या अमोघ वकृत्वाद्वारे मराठी माणसांच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!, अशी ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

  मनसेकडून व्हीडिओ शेअर

  तर दुकरीकडे मनसेनं ट्विट करत एक व्हीडिओ शेअर करत बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. “जा लढ, मी आहे… काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात… राजसाहेबांचा वंदनीय बाळासाहेबांशी अखेरचा ‘राज’कीय संवाद!” असं या ट्विटमध्ये मजकूर लिहिला आहे.