‘मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसून राज्यसभा निवडणूक…’; संभाजीराजेंचे मोठं वक्तव्य

खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Sambhaji Raje) यांनी 'स्वराज्य' संघटना स्थापन केल्याचे जाहीर केले. भविष्यात ही संघटना पक्ष म्हणून पुढे येईल. तसेच मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसून राज्यसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

    पुणे : खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Sambhaji Raje) यांनी ‘स्वराज्य’ संघटना स्थापन केल्याचे जाहीर केले. भविष्यात ही संघटना पक्ष म्हणून पुढे येईल. तसेच मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नसून राज्यसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

    खासदार छत्रपती संभाजीराजे पुण्यात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी केलेल्या सामाजिक आणि राजकीय कामाची दखल घेऊन मला संधी द्यावी. राज्यात २९ अपक्ष आमदार असून, मी त्यांची भेट घेऊन त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करणार आहे.

    राज्यभर दौऱ्यावर जाणार

    स्वराज्य संघटनेचा विस्तार करण्यासाठी मी या महिन्यापासून राज्यभर दौऱ्यावर जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दहा आमदारांनी मला निवडणुकीत अनुमोदन दिले तर निवडणूक निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

    …तर लोकसभा लढवू शकतो

    वेळ पडली तर मी लोकसभा निवडणूक लढवू शकतो. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची आहे.