अहमदनगर ते आष्टी रेल्वेला गोपीनाथ मुंडेंचं नाव देण्याचा आग्रह मी करणार नाही! – पंकजा मुंडेंनी केलं स्पष्ट

    बहुप्रतीक्षित असलेल्या अहमदनगर ते आष्टी ( Ahmednagar to Ashti railway) या रेल्वे मार्गाचे उदघाटन आज पारपडले असून या मार्गावर ‘डेमू रेल्वे’ सेवा सुरु करण्यात आली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावून या रेल्वे मार्गाचे उदघाटन केले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde)  , खासदार प्रीतम मुंडे, बाळासाहेब विखे पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

    बीड जिल्ह्यात झालेल्या या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उपस्थिती दर्शवून सर्व मान्यवरांचे स्वागत केले पंकजा यांनी उदघाटन प्रसंगी भाषण करताना या रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात आणताना कोणकोणत्या संघर्षातून लावे लागले याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘बीड जिल्ह्यातील ही रेल्वे म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते. मुंडे साहेब खासदार झाल्यावर बीडच्या रेल्वे प्रकल्पाला जेवढा निधी मिळाला तेवढा ७० पासून कधीही मिळाला नव्हता. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना देखील बीडच्या रेल्वे प्रकल्पासाठी मुंडे यांनी निधी खेचून आणला’.

    पुढे भाषणात त्यांनी सांगितले., गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ निधी द्यायची व्यवस्था केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना देखील या रेल्वे प्प्रकल्पाच खूप मोठे जात कारण त्यांनी मुंडे साहेबांच्या निधनानंतर जनतेला वचन दिल होत की, ‘ में बीड जिल्हा मे रेल्वे लानेका कार्य करुंगा और मुंडे जी का सपना पुरा करुंगा’. हा रेल्वे मार्ग हा रेल्वेच्या फायद्यासाठी नसला तरी पंतप्रधान आमच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो, असे पंकजा यांनी म्हंटले.

    पंकजा मुंडे यांनी भाषणादरम्यान मुंडे साहेबांचं नाव या नव्या रेल्वेला देण्याची लोकांची इच्छा असल्याचे सांगितले. मात्र मी अशा प्रकारचा आग्रह कधीही धरणार नाही असे पंकजा यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे याना त्यांचं नाव कोणत्याही संस्थेला अथवा कोणत्याही प्रकल्पाला दिलेलं आवडायचं नाही, त्यामुळे या रेल्वे प्रकल्पाला त्यांचं नाव देण्याचा आग्रह मी करणार नाही असे त्यांनी या भाषादरम्यान सांगितले.