मी शिवसेना सोडेल आणि राहुल गांधीच्या मागे जाईल - विश्वनाथ भोईर

कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर (Kalyan MLA Vishwanath Bhoir) यांनी राहुल गांधी यांना राहुल खान म्हणून संबोधित केले तसेच राहुल गांधी यांना एक दिवस घाण्याला जुपा मी खरोखर सांगतो मी शिवसेना सोडून देईल आणि राहुल गांधींच्या मागे येईल.

कल्याण : स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्या विरोधात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ (In Protest Of Statememt) महाराष्ट्रात शिवसेना (शिंदे गट) (Shivsena Shinde Group) आणि भाजप (BJP) यांच्याकडून सावरकर गौरव यात्रा (Savarkar Gaurav Yatra) काढण्यात येत आहे. कल्याणमध्ये (Kalyan) देखील ६ एप्रिल रोजी सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असून त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना आणि भाजप यांच्याकडून कल्याणमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर (Kalyan MLA Vishwanath Bhoir) यांनी राहुल गांधी यांना राहुल खान म्हणून संबोधित केले तसेच राहुल गांधी यांना एक दिवस घाण्याला जुपा मी खरोखर सांगतो मी शिवसेना सोडून देईल आणि राहुल गांधींच्या मागे येईल. ज्यांनी आयुष्यभर त्या ठिकाणी घाणा चालवला अशा प्रखर देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बोलण्याचा राहुल गांधी यांना अधिकार काय? असे आमदार विश्वनाथ भोईर यावेळी म्हणाले.