वैचारिक स्वैराचार म्हणजे उध्दव ठाकरे यांचे राजकारण; उद्धवजींना भाजपावर बोलण्याचा अधिकारच नाही, आमदार आशिष शेलार यांचा हल्लाबोल

उद्धव यांनी स्वतःचे कुटुंब सुद्धा एकत्र टिकवण्यात अपयशी ठरले. स्वपक्षातील नेते सोडून गेले, त्यांना एकत्र ठेवण्यामध्ये अपयश आलं,  स्वतःच सरकार टिकवण्यामध्ये, स्वतःचे मंत्री एकत्र ठेवण्यामध्ये ज्यांना अपयश आलं. त्या उद्धवजींनी केवळ आयुष्यामध्ये वैचारिक स्वैराचार केला.

    मुंबई- महाराष्ट्रात किंबहुना 90 च्या दशकानंतर ज्यांच्या वैचारिक स्वैराचाराचे उदाहरण कु पद्धतीने दिले जाईल असा, राजकीय व्यवहार म्हणजे उद्धवजींचे राजकारण होय. मला सर्व गोष्टी मांडायच्या नाहीत पण स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या कुटुंबामध्ये, स्वतःच्या पक्षामध्ये, स्वतःच्या सरकारमध्ये ज्यांना सलग अपयश आले. त्यांनी भाजपाला शिकवू नये, अशी टिका भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

    दरम्यान, उद्धव यांनी स्वतःचे कुटुंब सुद्धा एकत्र टिकवण्यात अपयशी ठरले. स्वपक्षातील नेते सोडून गेले, त्यांना एकत्र ठेवण्यामध्ये अपयश आलं,  स्वतःच सरकार टिकवण्यामध्ये, स्वतःचे मंत्री एकत्र ठेवण्यामध्ये ज्यांना अपयश आलं. त्या उद्धवजींनी केवळ आयुष्यामध्ये वैचारिक स्वैराचार केला. त्यांनी भारतीय जनता पक्षाला हे टोमणेने आणि उदाहरणे देण्याची आवश्यकताच नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली.

    उद्धव ठाकरे काय म्हणाले?

    “भाजपाकडे कोणी आदर्शच नसल्याने त्यांचा वारसा हडपण्याचा डाव असून सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे हे आपलेच असल्याचा मतलबी दावा भाजप करीत आहे. हिंमत असेल, तर भाजपने मोदींच्या नावाने मते मागून निवडणुकीत उतरावे आणि मी वडील बाळासाहेबांच्या नावाने मागीन. महाराष्ट्र कोणाच्या बाजूने उभा राहील, हे एकदा आमनेसामने होऊन जाऊ दे.”, असे आव्हान ठाकरे यांनी भाजपाला दिले आहे.

    उध्दव ठाकरे यांनी भाजपाला बाहेरख्याली म्हटले होते. त्यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर ही प्रतिक्रिया आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली. यावेळी त्यांनी ठाकरे गट तसेच वंचितच्या युतीवर देखील तोंडसुख घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी असले, तरी महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय भाजपला मते मिळू शकत नाहीत, हे मोदींनाही मान्य करावे लागले आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंती दिनानिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते.