अ‌ॅड. आंबेडकर मविआत आले तर स्वागतच, काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याचे वक्तव्य

आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे १ फेब्रुवारीला नांदेड येथे महासत्संग होणार आहे. अशोक चव्हाण या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी सोमवारी (३० जानेवारी) पत्रकार परिषद घेण्यात आली त्या वेळी ते बोलत होते.

    नांदेड – प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आले तर स्वागतच आहे. मागे मी प्रयत्न केले होते, पण तेव्हा ठरले नाही. आता उद्धव ठाकरे यांच्यामुळे ते येत असतील तर स्वागतच आहे. तसेच प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येणार असल्याबाबत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीशी अद्याप कुठलीही चर्चा झाली नाही, असेही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले.

    फेब्रुवारीला नांदेड येथे महासत्संग होणार
    आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे १ फेब्रुवारीला नांदेड येथे महासत्संग होणार आहे. अशोक चव्हाण या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी सोमवारी (३० जानेवारी) पत्रकार परिषद घेण्यात आली त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र अपेक्य मेंबर नंदकिशोर आवटी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे राज्य समन्वयक मकरंद जाधव, जिल्हा समन्वयक अंजली विजापुरे, आमदार मोहन हंबर्डे, माजी मंत्री डी.पी. सावंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर आदींची उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले की, बीआरएसचा नांदेडमधून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश होत आहे. त्यांचेही येथील राजकारणात स्वागतच आहे.

    नांदेडमध्ये दीड लाख भाविक येणार
    श्री श्री रविशंकर हे पहिल्यांदाच नांदेडमध्ये येत आहेत. धर्मनिरपेक्ष, हिंसामुक्त विचार, सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत आहेत. एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कौठा परिसरातील मामा चौकातील मैदानात महासत्संग होणार आहे. तीन वर्षांनंतर महाराष्ट्रात येत असल्याने भाविकांना उत्सुकता लागली आहे. ते नांदेडमध्ये मुक्कामी असतील. या कार्यक्रमासाठी जवळपास दीड लाख लोक येण्याची शक्यता आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.