अजित पवार जर भाजपासोबत गेले तर…, त्यांना किती आमदारांचा पाठिंबा? ‘या’ आमदारांनी स्पष्टच सांगितले आमचा दादांना…

आज आमदारांची अजित पवार (Ajit Pawar) बैठक घेणार असल्याची कालपासून बोललं जात आहे. मात्र अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षातच नाराज आहेत का? त्यांची पक्षात घुसमट होते का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. त्यातच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदारांनी पाठिंबा दिला आहे. दादा जे भूमिका घेतील, ती आम्हांला मान्य आहे, असं या आमदारांनी म्हटलं आहे.

    मुंबई : मागील काही दिवसांपासून मविआतील नेत्यांमध्ये सावरकर, अदानी, मोदी शैक्षणिक पदवी आदीवरुन मतभिन्नता दिसून येत आहे. यानंतर मागील आठवड्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात बैठक पार पडली. मागील आठवड्यात अचानक अजित पवार नॉट रिचेबल झाल्यानं चर्चांना उधाण आलं होत. त्यामुळं अजित पवार भाजपात प्रवेश करणार का? अजित पवार पक्षात नाराज असल्याचं बोललं जातंय. अजित पवार हे भाजपामध्ये जाणार अशी सुद्धा चर्चा सुरु आहे. दरम्यान, आज आमदारांची अजित पवार (Ajit Pawar) बैठक घेणार असल्याची कालपासून बोललं जात आहे. मात्र अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षातच नाराज आहेत का? त्यांची पक्षात घुसमट होते का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. त्यातच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदारांनी पाठिंबा दिला आहे. दादा जे भूमिका घेतील, ती आम्हांला मान्य आहे, असं या आमदारांनी म्हटलं आहे.

    किती आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा

    दरम्यान, अजित पवार जर उद्या भाजापासोबत गेले तर, भाजापला मोठी शक्ती मिळेल. त्यामुळं भाजपाला आणखी बळकटी मिळेल, पण अजित पवार हे एकटे जाणार नसून त्यांना अनेक आमदारांचा पाठिंबा असल्याचं बोललं जातंय. नाशिक, बारामती तसेच अनेक भागातून अनेक आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शविला आहे. “दादा जे भूमिका घेतील, ती आम्हांला मान्य आहे, असं या आमदारांनी म्हटलं आहे.” नितीन पवार, बनसोडे तसेच कोकाटे हे अजित पवारांसोबत जाणार आहेत.

    तर महाराष्ट्राच्या विकासाला आणखी गती मिळेल

    कल्याण पूर्व येथील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, पक्षामध्ये चर्चा सुरू आहे की एक मोठी घडामोड होणार आहे. खरंतर अजित दादा हे कणखर नेतृत्व आहे. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत ते आले तर महाराष्ट्राच्या विकासाला आणखी गती मिळेल, अशी प्रतिक्रिया गणपत गायकवाड यांनी दिली आहे.