
माझा मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न आहे दात तोडण्याची एवढी ताकद असेल तर औरंगजेबच्या कबरीवर ज्यांनी फूल अर्पण केलं आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा असे घडलं आहे. हिंमत असेल तर त्यांचे दात तोडून दाखवा. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या टीझरमध्ये ज्या प्रमाणे दात तोडण्याचे दाखवण्यात येत आहे. जर एवडी ताकद ताकद आहे तर त्यांची दात तोडून दाखवा तर आम्ही मानतो असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. 14 मे रोजी उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारपासून सुटका करण्यासाठी आपण हनुमान चालीसा पठन केले असल्याचे राणा दाम्पंत्यांनी म्हटले.
नवी दिल्ली : सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यांवरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकिकडे महागाईंन कहर केला आहे यावर कोणताही नेता बोलत नाही, मात्र भोंगे, मशिद, हनुमान चालीसा, आरती यावर राजकारण सुरु असल्यामुळं जनता सुद्धा कंटाळली आहे. दरम्यान हनुमान चालीस म्हणण्यास आग्रही असणारे राणे दाम्पंत्यांने आज नवी दिल्ली हनुमास चालीस पठन करत आरती म्हटली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला असून पुन्हा एक त्यांनी नवीन आव्हान मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
दरम्यान, आज नवी दिल्लीत नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आणि आरतीचे पठण दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे केले. यावेळी दिल्लीत राणा समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळालं, यावेळी समर्थकांनी ‘जय श्रीराम’ च्या घोषणाही लगावल्या. यावेळी राणा दाम्पत्यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल तर अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर कारवाई करावी, असे आव्हान खासदार नवनीत राणा यांनी दिले आहे. खासदार नवनीत राणा यांनी दिल्लीत हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी आज हनुमान चालीसा पठण केले आहे.
आज सकाळी 9.30 वाजता दिल्ली येथील राणा दाम्पत्यांच्या घरापासून पायी हनुमान मंदिरात पोहचले, जे त्यांच्या घरापासून सुमारे 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यावर टिका केली. माझा मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न आहे दात तोडण्याची एवढी ताकद असेल तर औरंगजेबच्या कबरीवर ज्यांनी फूल अर्पण केलं आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा असे घडलं आहे. हिंमत असेल तर त्यांचे दात तोडून दाखवा. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या टीझरमध्ये ज्या प्रमाणे दात तोडण्याचे दाखवण्यात येत आहे. जर एवडी ताकद ताकद आहे तर त्यांची दात तोडून दाखवा तर आम्ही मानतो असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. 14 मे रोजी उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारपासून सुटका करण्यासाठी आपण हनुमान चालीसा पठन केले असल्याचे राणा दाम्पंत्यांनी म्हटले.