एकनाथ शिंदेंनी कानात सांगितले असते तरी प्रॉब्लेम झाला नसता; अजित पवारांचा टोला

मी जेव्हा समोरच्या बाजूला पाहतो तर मूळ भाजपवाले कमी दिसतात. आमच्याकडची लोक जास्त दिसतात. मला मूळ भाजपवाल्यांचे वाईट वाटते. पहिली लाईन पाहिली तरी लक्षात येईल. गणेश नाईक, उदय सामंत, बबन पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील हे पहिल्या लाईनमध्ये आहेत. आमच्याकडून गेलेले दीपक केसरकर तर आज एकदम भारी प्रवक्ते झाले आहेत, आम्ही शिकवलेले कुठे वाया गेले नाही हे दिसते, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

    मुंबई : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) माझ्या कानात सांगितले असते की अडीच वर्ष झालीत, आता मला तिथे बसायचे आहे. तरी आम्ही तुम्हाला बसवले असते, काही प्रॉब्लेम झाला नसता, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना अजित पवार बोलत होते.

    अजित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा करताच पिनड्रॉप सायलेन्स होता. भाजपची काही मंडळी रडायला लागली. गिरीश महाजनांचे (Girish Mahajan) रडणे बंद होईना. फेटा बांधायला दिला तर डोळ्याचे पाणी पुसायला वापरायले. भाजपच्या (BJP) आमदारांनी सांगावे की खरंच झाले ते कसे झाले. हे जे घडले, त्याने समाधान झाले का हे सांगावे? चंद्रकांत दादा पाटील तुम्ही बेंच वाजवू नका तुम्हालाच मंत्रीपद मिळत की नाही, सभागृहात धाकधूक आहेत. शिवसेनेतून गेलेले ४० जणांपैकी किती जणांना मंत्रीपद मिळेल, माहिती नाही, असेही पवार म्हणाले.