एकनाथ शिंदेंनी सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला तर नक्कीच भाजपा स्वागत करेल, सत्तास्थापनेवरुन चंद्रकांत पाटीलांची प्रतिक्रिया

सध्या राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे, दिल्लीत शरद पवार व देवेंद्र फडणवीस (Sharad Pawar and Devendra fadnvis in delhi) आहेत, तर शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सुद्धा बैठका (Shivsena, NCP and Congress) घेत आहे, तसेच शिवसेनेसह काँग्रेसमध्ये सुद्धा बंडाला उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेचा काही प्रस्ताव दिला तर स्वीकारणार का? असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विचारण्यात आलं असता, नक्कीच याचं भाजपा पक्ष स्वागत करेल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

    मुंबई : सोमवारी विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) पार पडली. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 10 seat) रिंगणात उतरले होते. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगली होती. भाजपा व मविआ (BJP and MVA) या दोघांमध्ये अत्यंत चुरशीची लढाई झाली. अखेर रात्री निकाल (Election Result) हाती आल्यानंतर भाजपाचे पाचपैकी पाचही उमेदवार जिंकून आले आहेत. तर मविआचे सहापैकी पाच उमेदवार जिंकले असून, एक उमेदवार म्हणजे चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर आता ठाकरे सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसेच मविआमध्ये चलबिचलता तसेच सरकार अस्थिर होण्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या १३ समर्थक आमदारांसह (13 MLA)  नॉट रिचेबल आहेत. शिंदे हे आपल्या गटातील आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरत (Gujrat surat) आहेत. यामुळं महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. दरम्यान, या सर्व पाशर्वभूमीवर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येते आहेत, आता भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटीलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेचा काही प्रस्ताव दिला तर स्वीकारणार का? असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विचारण्यात आलं असता, नक्कीच याचं भाजपा पक्ष स्वागत करेल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

    सध्या राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे, दिल्लीत शरद पवार व देवेंद्र फडणवीस (Sharad Pawar and Devendra fadnvis in delhi) आहेत, तर शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सुद्धा बैठका (Shivsena, NCP and Congress) घेत आहे, तसेच शिवसेनेसह काँग्रेसमध्ये सुद्धा बंडाला उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी सत्तास्थापनेचा काही प्रस्ताव दिला तर स्वीकारणार का? असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विचारण्यात आलं असता, नक्कीच याचं भाजपा पक्ष स्वागत करेल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आम्ही काही भजनी मंडळी नाही. आम्हीही एक राजकीय पक्ष आहोत. त्यामुळे असा काही प्रस्ताव आला तर त्यावर नक्कीच विचार केला जाईल. त्यामुळे असा कोणताही प्रस्ताव भाजपाकडे आला तर, आम्ही नक्की विचार करू, एकनाथ शिंदे आमचे जुने सहकारी आहेत. असं चंद्रकांत पाटील म्हटलं आहे.