“इच्छा झाली तर ज्येष्ठ संपादक म्हणून जाईन- राऊत” खर्चावरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने तर आधी शेतकरी आत्महत्या…

प्रस्तावांचा विचार बैठकीत होईल व विभागासाठी सुमारे ४० ते ४५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले जाईल अशी शक्यता आहे. तसेच या बैठकीतून मराठवाड्याला भरघोस विकासकामांचा निधी मिळेल अशी आशा आहे. या बैठकीवरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

    छत्रपती संभाजीनगर : सात वर्षाच्या कालावधीनंतर आज, शनिवारी छत्रपती संभाजीनगरात (Chhatrapati Sambhaji Nagar) मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय राबवावयाच्या विकास योजनांचे विविध प्रस्ताव सादर करण्यात आले असून, ते सुमारे ५५ हजार कोटींच्या घरात असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्राप्त प्रस्तावापैकी काही निवडक प्रस्तावांचा विचार बैठकीत होईल व विभागासाठी सुमारे ४० ते ४५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले जाईल अशी शक्यता आहे. तसेच या बैठकीतून मराठवाड्याला भरघोस विकासकामांचा निधी मिळेल अशी आशा आहे. या बैठकीवरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. (If I wish, I will go as a senior editor – Raut” If the ruling-opposition face-to-face over the expense)

    इच्छा झाली तर…

    पत्रकार परिषदेमध्ये मलाही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचे आहेत. त्यामुळे मी देखील पत्रकार परिषदेला जाणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी काल म्हटले होते. त्या नंतर मला अनेक अधिकाऱ्यांचे फोन आले असून माझ्याकडे पोलिस देखील आले होते, असा दावा संजय राऊत यांनी केला. मी महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक आहे. माझी इच्छा झाली तर मी मुख्यमंत्र्यांच्या प्रेसला नक्की जाणार आहे. पण मी गेलो तर मला पोलिस अडवतील आणि गोंधळ होईल. मला असा गोंधळ नको आहे. खुद्द पोलिस आयुक्तांनी मला या प्रकरणी प्रश्न विचारला असल्याचे ते म्हणाले. मी जाणार म्हटले तरी सत्ताधारी का घाबरले‌? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    ४९ हजार २४८ कोटी रुपयांची घोषणा

    यापूर्वी २०१६ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत मराठवाडाच्या विकासाला उभारी देण्यासाठी ४९ हजार २४८ कोटी रुपयांचा कालबद्ध कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. या बैठकीत देखील मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र, या घोषणा फक्त कागदावरच होत्या, प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी झाली नाही, असा आरोप विरोधक करीत आहेत. मराठवाड्यात आरोग्य, सिंचन, रस्ते यासह विविध क्षेत्रांतील अनुशेष अद्याप भरून काढणे बाकी आहे. त्यासाठी भरीव अशी तरतूद करण्यासाठी, ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी ओरड केली जात आहे.

    तारांकित हॉटेलवरुन विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर टीका

    छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृहात मुक्काम करायचे. मात्र विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही ‘परंपरा’ धुडकावून लावत तारांकित हॉटेललाच पसंती दिली होती. त्यासाठी प्रशासनाने सुमारे 35 ते 40 हजार रुपये प्रतिदिन किराया असलेले तीन सूट बुकही केले. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृहात राहणे पसंत केले. पण यावरुन त्यांच्यावर मोठी टीका झाली.

    शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी थांबणार?

    आत्महत्याग्रस्त मराठवाडा आत्महत्या मुक्त करण्याच्या घोषणेचे काय झाले, हे सरकारने सांगावे असे ते म्हणाले. सरकारने शिळ्या कढीला फोडणी देऊ नये. नवे पॅकेज देऊन फसवणूक करू नये. मराठवाड्यातील जनता माफ करणार नाही, असेही विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले. तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही शिंदे सरकारच्या उधळपट्टीवर टीका करत सुनावले की, 2014 मध्ये त्यावेळी 49800 कोटीचे बजेट दिले होते. त्याचे काय झाले हे कोणीच सांगत नाही. दुसरीकडे मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी थांबणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.