
पुणे : ‘इंडिया’चे नाव भारत केल्यास देशाला गतवैभव व समृद्धी पुन्हा मिळेल आणि भारताचा चेहरामोहरा बदलेल,” असा दावा जगप्रसिद्ध खगोल व अंक शास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांनी केला. नावांची अक्षरे आणि त्यांची संख्या या कलाशास्त्रात पारंगत जुमानी यांच्या कारकिर्दीला नुकतीच २० वर्षे पूर्ण झाली आहेत.
‘इंडिया’ की ‘भारत’ या चर्चेला उधाण
देशभरात ‘इंडिया’ की ‘भारत’ या चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर अंक आणि नावांतील बदल यातून यश व समृद्धीचा मार्ग दाखवणाऱ्या जुमानी यांनी ‘भारत’ हेच नाव असायला हवे, असे सांगत त्यामागील अंकशास्त्र स्पष्ट केले आहे.हे 25 वर्षांपूर्वी श्वेता जुमानींचे वडील बन्सीलाल जुमानी यांनी त्यावेळी केलेले भाकीत आज प्रत्येक्षात येत आहे .
संख्या आणि नावांची कला
श्वेता जुमानी म्हणतात, “संख्या आणि नावांची कला इतिहासाला नवीन नाही. हे एक शास्त्र असून, ताऱ्यांइतकेच ते जुने आहे. एखाद्या व्यक्तीचे, संस्थेचे, ठिकाणचे नाव बदलल्याने व त्यांच्या अक्षरातील ताळमेळ साधल्याने प्रगतीतील अडथळे दूर होऊन यशाची शिखरे पादाक्रांत करता येतात. गेल्या २० वर्षांत अनेक उद्योजक, कलाकार, राजकारणी यांना नावांत केलेल्या बदलांचा मोठा फायदा झाला आहे. पुण्याचे नाव पूना ऐवजी पुणे केल्यानंतर शहराने प्रगती केली. आज पुणे देशातील अत्यंत महतवाचे शहर आहे.”
“भारत यामध्ये सहा ही संख्या येते, जी अतिशय शुभ आहे. आपल्या देशाचे नाव भारत केले, आपण आपल्याला भारत म्हणू लागलो, तर पुन्हा एकदा भारत देशाला पूर्वीचे वैभव प्राप्त होईल. त्यामुळे ‘इंडिया’चे नाव बदलून भारत करायला हवे,” असे जुमानी यांनी नमूद केले.