
एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी भेटले असतील. आम्ही काय करु? आम्ही आमचं काम करतो आहोत. कोण कुणाच्या जवळ जातंय, हा त्यांचा प्रश्न आहे. हे कसलं राजकारण सुरु आहे. राज ठाकरेंच्या पक्षाला १८ वर्ष झालीत तरी त्यांचं राजकीय पर्यटनच अद्याप सुरु आहे. हे चालू द्या…अशी संजय राऊतांनी राज ठाकरे व एकनाथ शिंदे भेटीवर टिका केली.
मुंबई– मालेगावच्या (Malegaon) सभेनंतर आज ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपा, शिंदे गट तसेच राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीवर शेलक्या शब्दांत टिका केली. सदू आणि मधू भेटले, आम्हाला बालभारतीत धडा होता. भेटले तर भेटू द्या ना, नव्यानं प्रेम उफाळून आलं असेल कुणाचं. काल मालेगावची विराट सभा झाली त्यावरुन त्यांच्या भावना उचंबळून आल्या असतील. एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी भेटले असतील. आम्ही काय करु? आम्ही आमचं काम करतो आहोत. कोण कुणाच्या जवळ जातंय, हा त्यांचा प्रश्न आहे. हे कसलं राजकारण सुरु आहे. राज ठाकरेंच्या पक्षाला १८ वर्ष झालीत तरी त्यांचं राजकीय पर्यटनच अद्याप सुरु आहे. हे चालू द्या…अशी संजय राऊतांनी राज ठाकरे व एकनाथ शिंदे भेटीवर टिका केली.
दिल्लीत राहुल गांधींची भेट घेणार
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, सावरकर हे आमचे दैवत आहेत. सावरकर आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा काल जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिला होता. यानंतर आज यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मी एक दोन दिवसात दिल्लीला जात असून, राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना आमची भूमिका समजावून सांगणार आहे, असं राऊत म्हणाले.
सदू आणि मधू भेटले…
सदू आणि मधू भेटले, आम्हाला बालभारतीत धडा होता. भेटले तर भेटू द्या ना, नव्यानं प्रेम उफाळून आलं असेल कुणाचं. काल मालेगावची विराट सभा झाली त्यावरुन त्यांच्या भावना उचंबळून आल्या असतील. एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी भेटले असतील. आम्ही काय करु? दरम्यान, उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, म्हणजे त्यांनी कोणत्या कंपन्यांकडून खोके घेतले, हे समोर येईल, असा आरोप सुहास कांदेंनी केला होता. त्याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, कालच्या मालेगाव येथील सभेत जनता यापुढे कोणाची नार्को टेस्ट करणार?, हे स्पष्ट झाले आहे. सुहास कांदेंच्या फालतु वक्तव्यावर मी बोलणार नाही, असं राऊत म्हणाले.