
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी अब्दुल सत्तार आज हिंगोलीत दाखल झाले होते. यावेळी शासकिय विश्रामगृहाच्या परिसरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन अब्दुल सत्तार यांच्या राज्यभरात टीकेची झोड उठली होती.
हिंगोली – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हिंगोलीत आले असते तर चांगले बघितले असते, असे वक्तव्य हिंगोलीचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी केले आहे. खासदार संजय राऊत जम्मू-काश्मिरात भारत जोडो यात्रेत सहभागी झाले, याकडे कसे बघता? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता अब्दुल सत्तार यांनी हे उत्तर दिले आहे.
पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी अब्दुल सत्तार आज हिंगोलीत दाखल झाले होते. यावेळी शासकिय विश्रामगृहाच्या परिसरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन अब्दुल सत्तार यांच्या राज्यभरात टीकेची झोड उठली होती. आता संजय राऊत यांना बघितले असते, असे वक्तव्य केल्याने पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
बाळासाहेबांची शिवसेना यांच्याकडेच धनुष्यबाण राहिल
धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होत आहे. यावर धनुष्यबाण कोणाला मिळेल? या प्रश्नावर अब्दुल सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना यांच्याकडेच धनुष्यबाण राहिल. मात्र, याबाबत निवडणूक आयोग, न्यायालय निर्णय देणार आहे. त्यामुळे यावर अधिक बोलणार नसल्याचेही अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.