शरद पवारांनी मदत केली तर मी राष्ट्रपती होणार : अभिजीत बिचुकले

मला शरद पवारांनी मदत केली तर राष्ट्रपती पदासाठी माझा मार्ग सोपा होईल. जसं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली तसं या नेत्यांनी मला पाठिंबा द्यायचं ठरवलं तर मला १०० सह्या सहज मिळतील. मी लढवय्या असून मी बहुजन समाजातील सामान्य व्यक्ती आहे. शरद पवारांनी मला मदत करावी." अशी आशा अभिजीत बिचुकले यांनी व्यक्त केली आहे.

    मुंबई : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं सांगितलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असो लोकसभा असो किंवा विधानसभा अशा सर्व निवडणुकांसाठी बिचुकले उमेदवारी अर्ज भरत असतात पण एकाही निवडणुकीत त्यांची वर्णी अजून लागलेली नाही.

    दरम्यान आता ते राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरणार असून, अर्ज भरण्यासाठी किमान १०० आमदारांच्या सह्याची आवश्यकता असते यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, असं बिचुकले म्हणाले आहेत. तसेचं “काही आमदारांशी माझं बोलणं सुरू आहे, मी राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरत आहे तुम्ही सही करणार का? अशी मी विचारणा आमदारांकडे करत आहे.” असं त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं.

    पुढे बोतलाना बिचुकले म्हणाले की, “यामागे माझा काहीच स्वार्थ नाही, मी एक बहुजन समाजातला सामान्य व्यक्ती आहे, हुशार आहे, मला नेत्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे.” असंही ते म्हणाले आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मदत केली तर आपण राष्ट्रपती होऊ शकतो असं ते म्हणाले.

    दरम्यान मागच्या वेळी अभिजीत बिचुकले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मला राष्ट्रपती करा अशी मागणी केली होती. “यावर्षी मला शरद पवारांनी मदत केली तर राष्ट्रपती पदासाठी माझा मार्ग सोपा होईल. जसं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली तसं या नेत्यांनी मला पाठिंबा द्यायचं ठरवलं तर मला १०० सह्या सहज मिळतील. मी लढवय्या असून मी बहुजन समाजातील सामान्य व्यक्ती आहे. शरद पवारांनी मला मदत करावी.” अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.