ठाकरेंनी शेण खावं की.. दोन्ही सुद्धा सारखंच , उद्धव ठाकरेही तुरुंगात जाणार; प्रसाद लाड यांची ठाकरेंवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात सभा घेत आहेत तर शिवसेनेकडून देखील उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे देखील मैदानात उतरले आहेत.

  लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election ) तिसऱ्या टप्प्यातील मतदान लवकरच पार पडणार आहे. मतदानपूर्वी सर्वच पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात सभा घेत आहेत तर शिवसेनेकडून देखील उमेदवारांचा प्रचार केला जात आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे देखील मैदानात उतरले आहेत. अशातच प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

  माणूस शेण खाऊदे किंवा.. खाऊ दे सारखाच – प्रसाद लाड

  प्रसाद लाड म्हणाले, देशामध्ये एक पप्पू आहे. तर राज्यामध्ये देखील उद्धव ठाकरे नावाचा एक पप्पू आहे. उद्धव ठाकरे एका सभेत म्हणाले होते, मी शेण खाल्ले म्हणून तुम्ही शेण खाणार का? ते शेण काय शेणाच्या पलीकडे सगळे खाल्ले आहे. खिचडी, मिठी नदीच्या चिखलातील देखील खाल्ले आहेत. मेलेल्या माणसांच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम कोणी केले असेल तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने, ते संजय राऊतांनी केले आहे, असे प्रसाद लाड म्हणाले. आम्ही शेण खाल्ले म्हणून तुम्ही शेण खाताय? तुम्ही आता काय करतायं? असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. या विधानावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरेंचा प्रसाद लाड यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

  ठाकरेंनी शेण खावं की.. दोन्ही सुद्धा सारखंच आहे,तसेच अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे देखील तुरुंगात जाणार असल्याचे प्रसाद लाड यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना प्रसाद लाड म्हणाले, उद्धव ठाकरेंसारखे धंदे करत नाही. उद्धव ठाकरेंनी गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांनासुद्धा जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यात ते यशस्वी झाले नाही. कारण उद्धव ठाकरे हे चुकीच्या मार्गाने चालले होते. ज्याप्रमाणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्यात आले त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांना देखील तुरुंगात पाठवले जाईल, असे प्रसाद लाड म्हणाले.

  राऊत नावाचा पोपट काय बोलतो याकडे कोणाचे लक्ष नाही – प्रसाद लाड

  उद्धव ठाकरे यांच्यासह प्रसाद लाड यांनी संजय राऊतांवर देखील टीका केली आहे. प्रसाद लाड म्हणाले, संजय राऊत यांच्याकडे बोलण्यासारखे काही राहिलेले नाही. भ्रमिष्ठ आणि बिथरलेले आहेत ते. एखाद्या व्यक्तीसोबत सतत राहिल्याने त्याचे गुण अवगुण दोन्ही देखील समजतात. संजय राऊत यांचे दोन्ही गुण उद्धव ठाकरेंकडे आले आहेत. तसेच संजय राऊत नावाचा पोपट काय बोलतो हे महाराष्ट्रातील जनता ऐकत नाही, असे म्हणत प्रसाद लाड यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.