
आज जे मनसैनिक शिंदे गटात प्रवेश करणारे हे मनसेचे पदाधिकारी नव्हते. ३ महिन्यापूर्वी ज्यांना काम करत नव्हते म्हणून काढले होते. त्यांना शिंदे गटात प्रवेश दिला गेला. तसेच ठाणे शहरातील काही परिसर सोडला तर, शिंदे गटाचं फारसं अस्तित्व नाही, अशी बोटची टिका मनसेनं शिंदे गटावर केली आहे.
ठाणे : शिवसेनेच्या आमदारांनी (Shivsena MLA) बंड केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले आहे. त्यानंतर आज मनसेनं (MNS) पहिल्यादाच शिंदे गटावर जाहिरपणे टिका केली आहे. आज ठाणे शहरातील काही मनसैनिकांनी शिंदे गटात (Shinde group) प्रवेश केला. यावर प्रतिक्रिया देताना मनसे नेते अविनाश जाधव (Avinash jadhav) यांनी शिंदे गटावर जाहिरपणे टिका केली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सक्रीय झाले आहेत. आज ठाणे जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंनी बैठक घेतली. या बैठकीनंतर जाधव यांनी शिंदे गटावर टिकास्त्र सोडले.
दरम्यान, आज जे मनसैनिक शिंदे गटात प्रवेश करणारे हे मनसेचे पदाधिकारी नव्हते. ३ महिन्यापूर्वी ज्यांना काम करत नव्हते म्हणून काढले होते. त्यांना शिंदे गटात प्रवेश दिला गेला. तसेच ठाणे शहरातील काही परिसर सोडला तर, शिंदे गटाचं फारसं अस्तित्व नाही, अशी बोटची टिका मनसेनं शिंदे गटावर केली आहे.