उपमुख्यमंत्री जेव्हा बॉम्ब फोडतील तेव्हा हे पितापुत्र जेलमध्ये असतील, तर संजय राऊत यांना कुठे पळायचं हे सुचणार नाही; आ. रवी राणा यांची टीका

तीन वर्षानंतर नागपुरात पाहिलं अधिवेशन शिंदे आणि फडणवीस सरकार मुळे होत आहे. सकाळी उठून फुसके बॉम्ब फोडले जात आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी लवंगी बॉम्ब फोडला तर सगळ्यांना भारी पडेल. उध्दव ठाकरे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा अधिवेशनात सहभागी झाले आहेत. त्यांनी विदर्भातील १० मोठे काम सांगितले तर माझ्या खासदारकीचा पाच वर्षाचा पगार मी संजय राऊत यांना देईल.

    अमरावती: संजय राऊत बॉम्ब नाही तर लवंगी फटाके फोडत आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. उध्दव ठाकरे यांच्या अनेक फाईल पेंडींग आहेत काहींचा तपास सुरू आहे. आधीच त्यांचे 40 आमदार सोडून गेले हा बॉम्ब आधीच फुटला आहे. फडणवीस जेव्हा बॉम्ब फोडतील तेव्हा उध्दव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील. असा बॉम्ब फुटला तर संजय राऊत यांना कुठे पळायचं हे सुचणार नाही, त्यांनी नागपुरात येऊन बॉम्ब फोडण्याची भाषा करू नये गेल्या अडीच वर्ष उध्दव ठाकरे यांनी कुठले पाच काम केले.

    हे संजय राऊत यांनी सांगितलं तर मी त्यांना बक्षीस देईल. संजय राऊत म्हणतील तर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बक्षीस देईल, कुठलेही काम न करता फडणवीस यांनी केलेल्या कामाचे उद्घाटन केले. अनेक बॉम्ब देवेंद्र फडणवीस यांनी फोडले आहे आता फडणवीस बॉम्ब फोडतिल तर हे कुठेही दिसणार नाही. महा विकास आघडतील अनेक मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात जामिनावर बाहेर आहे त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेला लोकांना अशी भाषा शोभत नाही.

    बॉम्ब कोण फोडेल यात जनतेला रस नाही
    तीन वर्षानंतर नागपुरात पाहिलं अधिवेशन शिंदे आणि फडणवीस सरकार मुळे होत आहे. सकाळी उठून फुसके बॉम्ब फोडले जात आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी लवंगी बॉम्ब फोडला तर सगळ्यांना भारी पडेल. उध्दव ठाकरे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा अधिवेशनात सहभागी झाले आहेत. त्यांनी विदर्भातील १० मोठे काम सांगितले तर माझ्या खासदारकीचा पाच वर्षाचा पगार मी संजय राऊत यांना देईल. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना सर्व काम तोंडपाठ आहेत. पण उध्दव ठाकरे यांना एकही प्रपोजल तोंडपाठ नाही. जनतेला काम हवे आहेत आरोप प्रत्यारोप साठी अधिवेशन नाही, जनतेच्या पैशातून अधिवेशनात खर्च केला जातो. कोणता बॉम्ब कोण फोडेल यात जनतेला रस नाही. खूप सारे विषय आहेत काम करताना चुका प्रत्येक व्यक्ती कडून होतात. जर ते पकडायला सुरुवात केली तर त्यांना हे भरी जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटाके फोडण्यात काही इंटरेस्ट नाही. त्यांना कामात इंटरेस्ट आहे. समृध्दी महामार्ग, मेडिकल काम यात व्हिजन दिसत आहे.