आम्ही जर डमी आहोत तर आमच्या विरोधात प्रचार करण्याची आवश्यकता का भासली? श्रीराम पाटलांचा सवाल

निवडणुकीच्या रींगणात श्रीराम पाटील विरुद्ध रक्षा खडसे अशी लढत होणार आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावरसुद्धा सर्वच पक्षाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.

  लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election ) तिसरा टप्पा लवकरच पार पडणार आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील (Shriram Patil) यांना उमेदवारी देण्यात आली असून त्याच्या विरुद्ध महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या रींगणात श्रीराम पाटील विरुद्ध रक्षा खडसे अशी लढत होणार आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावरसुद्धा सर्वच पक्षाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.श्रीराम खडसेंनी रक्षा खडसेंवर निशाणा साधला आहे.

  जनता आपल्यावर विश्वास ठेवणार आहे – श्रीराम पाटील

  श्रीराम पाटील म्हणाले, जनतेने आपल्यासारख्या नव्या माणसाला चांगला प्रतिसाद दिला आहे. आपल्यावर आणि पक्षावर विश्वास दाखवला आहे. एकनाथ खडसे मोठे आणि अनुभवी नेते आहेत.त्यांचा फायदा त्यांच्या पक्षाला होणार असला तरीसुद्धा तरी आपण मोठी मेहनत घेणार आहोत. आजपर्यंत आपण केलेल्या सामाजिक कार्याचा विचार करता जनता आपल्यावर विश्वास ठेवणार असल्याने समोर कितीही मोठा उमेदवार असला तरी लोक आपल्याला साथ देतील, असे श्रीराम पाटील म्हणाले.

  आमच्या विरोधात तुम्हाला स्वतःला प्रचारात उतरण्याची आवश्यकता का भासली? श्रीराम पाटील

  श्रीराम पाटील यांना डमी उमेदवार म्हणून डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर बोलताना श्रीराम पाटील यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. श्रीराम पाटील म्हणाले, भाऊ तुम्ही मोठे राजकारणी आहात. वडीलधारे आहात. आम्ही तुमचा आदर करतो. तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये राहा, आमच्यामध्ये पडू नका. आम्ही जर डमी आहोत तर मग आमच्या विरोधात तुम्हाला स्वतःला प्रचारात उतरण्याची आवश्यकता का भासली? असा प्रश्न श्रीराम पाटील यांनी उपस्थित केला आहे. क्लीप क्लीप खेळू नका, कोणाच्या किती क्लीप आहेत हे सगळ्यांना माहित आहे. आपल्याला किल्पचे राजकारण करायचे नाही. मला समाजाची सेवा करणारा राजकारणी बनायचे आहे. मेहनत करून जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. मी लढणार आणि जिंकणार, असा विश्वास श्रीराम पाटील यांनी व्यक्त केला आहे.

  राष्ट्रवादी पक्षाला एकनाथ खडसेंनी फसवल्याचे अनेकदा बोलले जाते. मी त्याबाबत बोलणार नाही. त्यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) आमच्यासोबत आहेत. त्यांनी आम्हाला लीड दिल्याचे पक्षाने सांगितले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने कोणत्याही गोष्टीला बळी पडू नये. आता परिवर्तन होणे महत्वाचे आहे आणि ते घडेल याची खात्री आहे. पण परिवर्तन झाले नाही तर तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार राहील किंवा नाही सांगता येत नाही, असे श्रीराम पाटील म्हणाले.