cm eknath shinde

गेली अनेकवर्षे मला विरोधक चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, विरोधकांचे स्वप्न काही साकार होत नाही. काही विरोधक तिरकी चाल चालवतात, काही अडीच घरे चालणारे घोडे राजकारणात आहेत. पण जनता सोबत असल्याने विरोधकांच नेहमी चितपट होत आहेत.

    मुंबई – मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे तीन दिवस सातारा दौऱ्यावर होते. तसेच प्रकृती बरी नसल्यामुळं पुण्यातील चांदणी चौक कार्यक्रमाला हजेरी लावू शकले नव्हते. मात्र कालपासून अर्थात १५ ऑगस्टपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. काल मुख्यमंत्र्यांनी शासकीय ध्वजारोहण केले. यानंतर त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. (If we want to fight with political opponents, opponents like us need to play chess, at whom is Chief Minister Eknath Shinde’s finger pointing)

    मी चेकमेट होत नाहीय

    दरम्यान, पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेली अनेकवर्षे मला विरोधक चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, विरोधकांचे स्वप्न काही साकार होत नाही. काही विरोधक तिरकी चाल चालवतात, काही अडीच घरे चालणारे घोडे राजकारणात आहेत. पण जनता सोबत असल्याने विरोधकांच नेहमी चितपट होत आहेत. राजकीय विरोधकांशी लढा द्यायचा असेल तर आमच्यासारख्या विरोधकांना बुद्धीबळ खेळणे फार गरजेचे आहे, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना काढला.

    विश्वनाथन आनंद यांनी अनेकांना चेकमेट केले
    गेल्या वर्षी आम्ही जी क्रांती केली, त्यानंतर आम्हाला राजकारणातले ग्रॅंड मास्टर बोललात. ठाण्यात समाजकारणातील ग्रॅंड मास्टर आनंद दिघे आहेत. ठाण्यात पद्मविभूषण बुद्धिबळपट्टू विश्वनाथन आनंद येत आहेत. त्यांचे स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांनी अनेकांना चेकमेट केले आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.