तुम्ही वाढदिवस साजरा करताय? मग ‘हे’ तर करुच नका

केकवर (Cake) लावलेली मेणबत्तीवर फवारे उडविल्याने स्फोट (blast) होण्याची शक्यता आहे. अशीच धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली आहे. केकवर लावलेली मेणबत्तीवर फवारे उडल्याने मोठा स्फोट झाला आहे. यात दहा वर्षाचा मुलगा जखमी झाला असून, या स्फोटात या मुलाचा संपूर्ण गाल फाटला आहे. चंद्रपुरातील ब्रह्मापुरी (Brahmapuri in Chandrapur) शहरात ही घटना घडली आहे.

    चंद्रपूर : हल्ली प्रत्येकजण आपला वाढदिवस (Birthday) साजरा करत असतो. धूमधडाक्यात आपला वाढदिवस साजरा (Birthday celebration) व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढविली जाते. मात्र या गोड दिवशी, वाढदिवस साजरा (Birthday) करताना एका छोटा चुकीमुळं (mistake) या दिवशी रंगाचा बेरंग होऊ शकतो. जर तुम्ही वाढदिवस साजरा (Birthday celebration) करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. याला कारण सुद्धा असेच आहे.

    वाढदिवस साजरा करत असताना, केकवर (Cake) लावलेली मेणबत्तीवर फवारे उडविल्याने स्फोट (blast) होण्याची शक्यता आहे. अशीच धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली आहे. केकवर लावलेली मेणबत्तीवर फवारे उडल्याने मोठा स्फोट झाला आहे. यात दहा वर्षाचा मुलगा जखमी झाला असून, या स्फोटात या मुलाचा संपूर्ण गाल फाटला आहे. चंद्रपुरातील ब्रह्मापुरी (Brahmapuri in Chandrapur) शहरात ही घटना घडली आहे. दरम्यान, जखमी मुलाच्या गालावर शंभरच्यावर टाके पडले आहेत, आरंभ डोंगरी असं या जखमी मुलाचे नाव आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या वाढदिवशी मेणबत्तीवर चुकून सुद्धा फवारे उडवू नका, अन्यथा स्फोट होण्याची शक्यता आहे.