‘हिंमत असेल तर या आमनेसामने’, उद्धव ठाकरेंचं शिंदे-भाजपाला आव्हान, ‘तुम्ही मोदींचा फोटो लावा.. आम्ही’

उद्योग पळवले, आर्थिक केंद्र तिकडे नेले. आता त्यांना ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापायचीय. मात्र, काही झाले तरी मुंबई लुटू देणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईत झालेला मेट्रो उदघाटन कार्यक्रम आणि भाषणाला जोरदार प्रत्युत्त दिले. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘साहेब जन्मदिवस’ कार्यक्रम झाला.

    मुंबई – निवडणूक जिंकायची असेल तर बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही हे आजही सत्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ते मान्य आहे. त्यामुळेच तर खोकेवाले बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरत आहेत. आज तुम्हाला आव्हान देतो जर हिंमत असेल तर निवडणुका घ्या. आम्ही बाळासाहेबांचा फोटो घेऊन येतो. तुम्ही मोदींचा फोटो घेऊन या. बघू लोक कुणाला मत देतात? असं थेट आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही त्यांनी आज निशाणा साधला. तसंच शिंदे गटाला मिंधे गट असं म्हणत टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त खास कार्यक्रम मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

    काही झाले तरी मुंबई लुटू देणार नाही
    उद्योग पळवले, आर्थिक केंद्र तिकडे नेले. आता त्यांना ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापायचीय. मात्र, काही झाले तरी मुंबई लुटू देणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईत झालेला मेट्रो उदघाटन कार्यक्रम आणि भाषणाला जोरदार प्रत्युत्त दिले. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘साहेब जन्मदिवस’ कार्यक्रम झाला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली.

    स्वतःचे वडील लक्षात ठेवा म्हणजे झालं नाहीतर स्वतःचे वडील विसरायचे
    वडील चोरणारी ही अवलाद आहे. स्वतःचे वडील लक्षात ठेवा म्हणजे झालं नाहीतर स्वतःचे वडील विसरायचे. काल म्हणाले शरद पवार गोड माणूस. आधी म्हणाले की मी मोदी का आदमी. नेताजींच्या मुलींचं वक्तव्य मी ऐकलं. त्या म्हणाल्या नेताजींचा वारसा ढापण्याचा डाव आहे. इथेही तेच तेच चाललं आहे. सरदार पटेल आमचे, बाळासाहेब आमचे, बाबासाहेब आंबेडकर आमचेच. मोदी के आदमी, चेहरा बाळासाहेबांचा का? कारण बाळासाहेबांच्या फोटो शिवाय मतं मिळत नाहीत. हिंमत असेल तर तुम्ही मोदींचा फोटो लावून या आम्ही आमच्या वडिलांचा फोटो घेऊन येतो. बघा कोण जिंकतं? महाराष्ट्रात निवडणूक जिंकायची असेल तर बाळासाहेबांना पर्याय नाही. हे मोदींनाही मान्य आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.