सामंजस्याचं राजकारण करायचं नसेल, तर एकत्र असल्याचं नाटक कुणी करु नये, उद्धव ठाकरेंनी मविआला खडसावलं…मविआत आलबेल नाही?

आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरित मविआतील समन्वयावर बोट ठेवले. मविआत सामंजस्य करार कारावा लागेल, असं म्हटलं. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, सामंजस्याचं राजकारण करायचं नसेल, तर एकत्र असल्याचं नाटक कुणी करु नये, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मविआला खडसावलं आहे.

  मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणाचा आजपासून नवा अध्याय सुरू झाला आहे. कारण राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची आज घोषणा झाली आहे. आज हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंतीचे (Birth Annivesary) औचित्य साधत शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकरांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. ज्या स्वप्नाची राज्याची जनता वाट पाहत होती, ती इच्छा पूर्ण झालीय. आम्ही प्रकाश आंबेडकरांसोबत (Prakash Ambedkar) पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेले आहोत. असं उद्धव ठाकरेंनी (Udhav Thackeray) म्हटलं.

  सामंजस्य करार कारावा लागेल…

  दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरित मविआतील समन्वयावर बोट ठेवले. मविआत सामंजस्य करार कारावा लागेल, असं म्हटलं. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, सामंजस्याचं राजकारण करायचं नसेल, तर एकत्र असल्याचं नाटक कुणी करु नये, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मविआला खडसावलं आहे…यामुळं मविआत सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र आहे. कारण जूनमध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत कोणच्या उमेदवाराला मतदान करण्यावरुन मविआत मतभेद झाल्याचे पाहयला मिळाले होते. मतदान करण्यावरुन शिवसेनेते एकमत झाले होते, मात्र शेवटच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये एकमत झाले नव्हते. तेव्हा देखील मविआत समन्वय नाही हे दिसून आले होते. यामुळं आज उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, मविआत सामंजस्य करार कारावा लागेल.

  विधापरिषद निवडणुकीवरुन मविआत घोळ…

  विधानपरिषदेतील पदवीधर व शिक्षक निवडणुकीत पुन्हा एकदा आलबेल नसल्याचं दिसून आले. कारण नाशिक व नागपूरमधील उमेदवारांवरुन मविआत एकमत होत नव्हते. तसेच नाशिकमधील काँग्रेस उमेदवारांने घातलेला घोळ आदीवरुन मविआत एकमत किंवा समन्वय नसल्याचं दिसून आले.

  पवारांच्या भूमिकेकडे लक्ष…

  दरम्यान, शरद पवारांना पहिल्यापासून विरोध करणार प्रकाश आंबेडकरांनी आता भूमिक बदलली आहे, काँग्रेससह राष्ट्रवादी देखील आम्हाला चालेल असं आंबेडकरांनी म्हटलंय. मात्र वंचितचा घटक पक्ष म्हणून किंवा वंचित मविआत घेण्याबाबत शरद पवारांची यावर कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळं पवार कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

  वंचित अद्याप समावेश नाही…

  वंचित बहूजन आघाडी आणि शिवसेनेने आज युती केली असती तरी वंचितचा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमचा विरोध केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आमचे पूर्वी चांगले सख्य होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला महाविकास आघाडीत घेण्यासाठी विरोध करणार नाही, असा विश्वास वाटतो.