संसदेत बोललो तर निलंबन येथे बोललो तर लाईट बंद; खासदार कोल्हेंची सरकारवर टीका

सध्या शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवनेरी ते पुणे जन आक्रोश मोर्चा सुरु केला असून, या मोर्चा दरम्यान लाईट गायब झाल्याने संसदेत बोललो तर निलंबन येथे बोललो तर लाईट बंद होते, अशी खोचक टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर केली आहे.

    शिक्रापूर : सध्या शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवनेरी ते पुणे जन आक्रोश मोर्चा सुरु केला असून, या मोर्चा दरम्यान लाईट गायब झाल्याने संसदेत बोललो तर निलंबन येथे बोललो तर लाईट बंद होते, अशी खोचक टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर केली आहे. केंदूर (ता. शिरुर) येथे जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून खासदार डॉ. अमोल कोल्हे नागरिकांशी संवाद साधतना बोलत होते, यावेळी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ( शरद पवार ) प्रवक्ते विकास लवांडे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांसह आदी उपस्थित होते.
    दरम्यान यावेळी बोलताना पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्ली वारी करणाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीमध्ये सांगण्याची हिम्मत देखील नाही, असा देखील टोला खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचे नाव न घेतला लगावला तर संसदेत बोलायला लागलो तर निलंबन आणि येथे बोलायला लागलो तर लाईट बंद परंतु यांना हे माहित नाही संसदेत बोललो नाही तर जनतेत जाऊन बोलता येते आणि लाईट बंद केली तर जनरेटर लावून बोलता येेते, असे देखील अमोल कोल्हे म्हणाले.
    कोल्हेंना खाऊ घातला चटणी भाकरीचा घास
    केंदूर येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काढलेल्या जनआक्रोश मोर्चा दरम्यान अनेक महिलांनी खासदार कोल्हे यांच्याकडे कांद्याच्या माळा देऊन त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोहचवण्याची विनंती करत काही ज्येष्ठ महिलांनी चटणी भाकरीचा घास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना खाऊ घातला.