Professors murder smacks of immoral relationship strangulation by wife and lover

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीमधील सहाय्यक अभियंता संतोष दत्तात्रय सुवर्णकार हे २१ जुलै रोजी ऑफीसमध्ये असताना त्यांना एक फोन आला. फोनवरून आरोपीने उद्याचा सूर्य बघायचा असेल, तर दहा लाख रूपये कॅश तयार ठेव, नाहीतर तुझ्या आयुष्याला कायमचा फूलस्टॉप लागेल, अशी धमकी दिली.

    पिंपरी- एमआयडीसी भोसरी येथील अभियंत्याला जिवे मारण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या आरोपीला खंडणी विरोधी पथकाने २८ जुलै रोजी अटक केली आहे. रोशन बबन कानगुडे (वय.२२ रा.आंबीगाव मावळ) असे अटक आरोपीचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीमधील सहाय्यक अभियंता संतोष दत्तात्रय सुवर्णकार हे २१ जुलै रोजी ऑफीसमध्ये असताना त्यांना एक फोन आला. फोनवरून आरोपीने उद्याचा सूर्य बघायचा असेल, तर दहा लाख रूपये कॅश तयार ठेव, नाहीतर तुझ्या आयुष्याला कायमचा फूलस्टॉप लागेल, अशी धमकी दिली.

    सुवर्णकार यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक शोध सुरु केला. यावरून पोलिसांना आरोपी हा एमआयडीसी तळेगाव येथील जेसीबी कंपनीच्या गेट नंबर चार जवळ असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची तोंडी कबुली दिली. त्याच्याजवळून पोलिसांनी ऍपल कंपनीचा आयफोन ११ हा ३० हजार ५०० रुपयांचा फोन जप्त केला. याचा पोलीस पुढील तपास करीत आहेत.