चंदीगडनंतर IIT मुंबईत MMS कांड; कँटीन कर्मचाऱ्याने बाथरूमच्या खिडकीतून केला हिडिओ, विद्यार्थिनीचा आरोप

रविवारी रात्री कँटीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने वसतिगृहाच्या बाथरूममध्ये तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला. असा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. पोलिसांनी संशयिताला चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.​​

    मुंबई – पवई आयआयटीमध्ये गर्ल हाॅस्टेलमधील बाथरूममध्ये विद्यार्थिनीचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला, ही धक्कादायक घटना उघडकीस येताच पवई पोलिसांनी संशयिताला रविवारी अटक केली.

    चंदीगड विद्यापीठातील एमएमएस प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईतही तसाच प्रकार घडला आहे. हॉस्टेलच्या कँटीनमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने बाथरूमच्या खिडकीतून विद्यार्थिनीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. या प्रकरणी पवई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    रविवारी रात्री कँटीनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने वसतिगृहाच्या बाथरूममध्ये तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला. असा आरोप विद्यार्थिनीने केला आहे. पोलिसांनी संशयिताला चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.​​पिंटू गरिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपीच्या मोबाईलमधून अद्याप कोणताही व्हिडीओ सापडलेला नाही. ​​​​​आयआयटी मुंबईने या घटनेचा निषेध केला आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत असून या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

    दरम्यान यासाठी आयआयटीकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यात त्यांनी नाईट कॅटीनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीकडून ही प्रकार झाल्याचे सांगताना कॅटीन बंद करण्यात आल्याचे सांगितले आहे. जेव्हा महिला कर्मचारी असतील तेव्हाच ही कॅटींन सुरू राहणार आहे, असेही आयआयटीने स्पष्ट केले आहे. आम्ही विद्यार्थ्यासह आहोत असेही निवेदनात म्हटले आहे. संशियताने ज्या पाईपचा वापर केला, तो परिसर सध्या ब्लॉक करण्यात आला आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जे आवश्यक आहे, ते सर्व आम्ही करू असे निवेदनात म्हटलं आहे.