Illegal abortion of wife by doctor, mother-in-law with husband, physical and mental torture of father-in-law, Dr. Case filed against 7 persons including Kanthale

लग्नानंतर पती डॉ. मोहन कंठाळे यांच्यासह सासू, सासरे यांनी तिचा छळ सुरू केला. तुझी उंची कमी आहे, असे सांगून सासरच्यांनी तिचा छळ केला, माहेरून दहा लाख रुपये आणि एसी आणण्यासाठी तगादा लावत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. डॉ. मोहन कंठाळे यांनी माहेरून पैसे आणले नाही म्हणून बेदम मारहाण केली, असा आरोप करण्यात आला आहे.

  अमरावती : बेकायदेशीर गर्भपात करून पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. मोहन मधुकर कंठाळे याच्यासह सात जणांविरुद्ध राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. रुपाली कंठाळे यांनी या घटनेची तक्रार केली आहे. डॉ. मोहन मधुकर कंठाळे (प्रियंका कॉलनी), मधुकर नामदेव कंठाळे (प्रियंका कॉलनी), मीना मधुकर कंठाळे, अंबादास डोईफोडे (बेलखेड कामठा, वाशिम), प्रियंका अंकुश विल्हेकर (दर्यापूर), माया जितेंद्र रावेकर व विजय अंबादास डोईफोडे (न्यू विजय नगर) अशी आरोपींची नावे आहेत.

  १० महिने अत्याचार

  रुपालीचा विवाह २० जून २०२१ रोजी इर्विनमध्ये कार्यरत डॉ. मोहन कंटाळे सोबत हिंदू रितीरिवाजांनुसार झाला होता. यावेळी वधूच्या वडिलांनी तीन लाख रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने दिले होते. लग्नानंतर पती डॉ. मोहन कंठाळे यांच्यासह सासू, सासरे यांनी तिचा छळ सुरू केला. तुझी उंची कमी आहे, असे सांगून सासरच्यांनी तिचा छळ केला, माहेरून दहा लाख रुपये आणि एसी आणण्यासाठी तगादा लावत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. डॉ. मोहन कंठाळे यांनी माहेरून पैसे आणले नाही म्हणून बेदम मारहाण केली, असा आरोप करण्यात आला आहे.

   जबरदस्तीने केला गर्भपात

  एक महिन्याची गरोदर असतांना १५ सप्टेंबर २०२१ रोजी पती डॉ. मोहन कंठाळे याने बेकायदेशीररित्या गर्भपाताच्या गोळ्या देऊन जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप केला आहे.

  डॉ. मोहन कंठाळे यांच्यावर पोलीस कारवाईबाबत कोणतीही कल्पना नाही. याची दखल घेऊन पुढील कारवाई करणार आहे.

  कारवाई करू –  डॉ. अमोल नरोटे, निवासी वैद्यकीय अधिकारी