वरवंड येथे वन विभागाच्या हद्दीत बेकायदा खोदकाम! वनसंपत्तीचे रक्षण आणि जतन करण्यास दौंड वनविभाग ठरतोय अपयशी

दौंड तालुक्यातील वरवंड येथील वनविभागाच्या हद्दीतील वनक्षेत्रात जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या साह्याने बेकायदा खोदकाम सुरू आहे. संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी व वन्यजीव प्रेमी करीत आहेत. दौंड तालुक्यात वनविभागाच्या हद्दीत सध्या दिवसाढवळ्या घुसखोरी करून बेकायदा कामे करण्याचे धाडस वाढत चालले आहे. दौंड च्या पुर्व भागातील मलठण राजेगाव वाटलुज नायगाव परिसातील वन विभागाच्या हद्दीत बेकायदा वृक्षतोड आणि कोळसा भट्ट्या सुरू असतानाचे प्रकरणं चर्चेत आहे.

    पाटस : दौंड तालुक्यातील वरवंड येथील वनविभागाच्या हद्दीतील वनक्षेत्रात जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या साह्याने बेकायदा खोदकाम सुरू आहे. संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी व वन्यजीव प्रेमी करीत आहेत. दौंड तालुक्यात वनविभागाच्या हद्दीत सध्या दिवसाढवळ्या घुसखोरी करून बेकायदा कामे करण्याचे धाडस वाढत चालले आहे. दौंड च्या पुर्व भागातील मलठण राजेगाव वाटलुज नायगाव परिसातील वन विभागाच्या हद्दीत बेकायदा वृक्षतोड आणि कोळसा भट्ट्या सुरू असतानाचे प्रकरणं चर्चेत आहे. तर तालुक्यातील इतर गावांमध्ये ही वनविभागाच्या हद्दीत बेकायदा अतिक्रमण केले जात आहे. तर वनक्षेत्रात बेकायदा माती, मुरुम उत्खन्न करणे, वाहतूक करणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. वनक्षेत्राचे झाडे, माती, मुरुम,रस्ते या वनसंपत्तीचे रक्षण करणे आणि जतन करण्यासाठी शासनाने विविध पदांवर अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करुन प्रत्येकाला जबाबदारी आणि कर्तृत्व दिली आहेत. मात्र सध्या दौंड तालुक्यात वनसंपत्तीचे रक्षण आणि जतन होताना दिसत नाही. वरवंड येथील वनविभागाच्या हद्दीत सायंकाळी चार वाजण्याच्या आसपास एक पोकलेन व जेसीबी मशीन च्या साह्याने खोदकाम सुरू केले आहे. या खोदकामात काही झाडे तोडून नुकसान ही झाले आहे. यासंदर्भात काही शेतकऱ्यांनी हे खोदकाम त्वरित थांबवुन संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी वनविभागाकडे केली आहे. दरम्यान, यासंदर्भात वरवंड वनविभागाच्या परिमंडल वनपाल शितल खेंटके यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की वनविभाने वनक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्याची परवानगी दिली नाही. या संदर्भात तक्रारी आल्या असून वनरक्षक आणि वनकर्मचारी यांना हे खोदकाम थांबवण्याचे व संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.